शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हाइट हाऊस गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
3
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
4
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
5
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
6
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
8
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
9
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
10
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
11
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
13
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
14
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
15
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
16
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
17
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
18
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
19
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
20
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

वीज थकबाकीत गेवराई तालुका ‘अव्वल’

By admin | Updated: January 28, 2015 00:57 IST

राजेश खराडे , बीड महिन्याकाठी सरासरीइतकीही वसुली न झाल्याने जिल्ह्यात सर्वाधिक थकबाकी ही गेवराई तालुक्याकडे आहे. ग्राहकांची संख्या अधिक असूनही वीजचोरीचे प्रमाण अधिक

राजेश खराडे , बीडमहिन्याकाठी सरासरीइतकीही वसुली न झाल्याने जिल्ह्यात सर्वाधिक थकबाकी ही गेवराई तालुक्याकडे आहे. ग्राहकांची संख्या अधिक असूनही वीजचोरीचे प्रमाण अधिक असल्यामुळे वसुलीला मात्र खिळ बसली आहे. सध्य स्थितीला तालुक्याकडे जवळपास १३५ कोटीची थकबाकी आहे. वाढती थकबाकी पाहता तालुक्यात भारनियमनही अधिकच्या प्रमाणात करण्यात आले आहे. गेवराई तालुक्यात विजेचा वापर करणाऱ्या ग्राहकांची संख्याही अधिक आहे. मात्र ग्राहकांच्या तुलनेत महिन्याकाठी वसुली होत नाही. तालुक्यात घरगुती, व्यापारी, औद्योगिक, शेतीपंपग्राहक, सार्वजनिक पाणीपुरवठा विभाग व पथदिव्यांची एकुण ३८ हजार सहाशे ग्राहक आहेत. तर थकबाकी ही १३५ कोटीच्या घरात गेली आहे.सर्वाधिक तोटा शेती पंपग्राहकांचा तालुक्यात ३८ हजार ६०० पैकी २३ हजार ऐवढी शेतीपंप ग्राहकांची संख्या आहे. अतिरीक्त विद्युत पंपाचा भार वाढल्यामुळे या परिसरातील ट्रान्सफारर्मरचाही धुरुळा उडत आहे. तर केवळ शेतीपंपग्राहकांकडेच १११ कोटी २३ लाख रुपयांची थकबाकी आहे. तालुक्याची थकबाकी अधिक असल्याने भारनियमनही याच तालुक्यात सर्वाधिक प्रमाणात आहे.वसुली मोहिमाही फेल जिल्ह्यात सर्वाधिक थकबाकी गेवराई तालुक्यात असल्याने महावितरण कंपनीने याच भागात तगडी वसुली यंत्रना लावली होती. मात्र सर्वाधिक थकबाकी असतानाही सर्वात कमी वसुली तालुक्यातून होत आहे. त्यामुळे महिन्याकाठी थकबाकीत कमी न होता वाढच होत आहे. महावितरणचे कर्मचारी वसुलीकरिता गेले असता ग्राहकांकडूनच त्यांना अरेरावीची भाषा ऐकूण घ्यावी लागत आहे.मानसिकता बदलणे आवश्यकबदलत्या काळाच्या ओघात वीज ही मुलभूत गरज आहे. महावितरण कंपनीकडून अगोदर ग्राहकांना सेवा देऊन नंतर बील आकारणी केली जाते. मात्र ग्राहकांची मानसिकता नसल्यानेच थकबाकीत वाढ होत आहे. त्यामुळे ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांनी आपली मानसिकता बदलणे आवश्यक असल्याचे अधिक्षक अभियंता सुंदर लटपटे यांनी सांगितले.