शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

महागाई भत्त्यासह पेन्शनवाढ मंजूर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 23:26 IST

औरंगाबाद : महागाई भत्त्यासह साडेसात हजार रुपये पेन्शन मंजूर करा, मोफत वैद्यकीय सुविधा लागू करा, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पेन्शनवाढ ...

ठळक मुद्देपेन्शनधारकांची मागणी : घोषणांनी दणाणला कर्मचारी भविष्य निधी संघटन प्रादेशिक कार्यालयाचा परिसर

औरंगाबाद : महागाई भत्त्यासह साडेसात हजार रुपये पेन्शन मंजूर करा, मोफत वैद्यकीय सुविधा लागू करा, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पेन्शनवाढ मंजूर करा, यासह पेन्शनधारकांनी दिलेल्या विविध घोषणांनी सोमवारी सिडकोतील कर्मचारी भविष्य निधी संघटन प्रादेशिक कार्यालयाचा परिसर दणाणून गेला.ईपीएस-९५ राष्ट्रीय संघर्ष समितीतर्फे सोमवारी कर्मचारी भविष्य निधी संघटन कार्यालयासमोर (पीएफ) धरणे देण्यात आली. आंदोलनासाठी संपूर्ण मराठवाड्यातून अल्प पेन्शनधारक शहरात दाखल झाले होते. यावेळी आंदोलकांनी ‘भगतसिंह कोशीयारी कमिटी लागू करा’, ‘३१ मे २०१७ चे परिपत्रक रद्द करा’ यासह पेन्शनवाढीसंदर्भातील विविध फलक हाती धरले होते. मागण्यांसंदर्भात जोरदार घोषणा देण्यात येत होत्या. आंदोलनात महिलांचाही उत्स्फूर्त सहभाग होता. यावेळी अल्प पेन्शधारकांचा मेळावाही पार पडला. यामध्ये उपस्थितांनी अल्प पेन्शनमुळे भेडसावणाऱ्या समस्या मांडल्या.आंदोलनाला एस. एन. आंबेकर, जिल्हा सचिव कमलाकर पांगारकर, साहेबराव निकम, डी. ए. लिपणे पाटील, मोहन हिंपळनेकर, भास्कर मतसागर, किसन साळवे, सानोपंत कावळे, एच. सी. चव्हाण, डी. एच. करजगावकर, अशोक चक्रे, निर्मला बडवे, गोविंदअप्पा डांगे, मुकुंद कुलकर्णी, मारोती फुलारी, नारायण ठोकळे आदी उपस्थित होते.अहवाल, पत्रकाची होळीआंदोलनात पेन्शनधारकांकडून उच्च अधिकार नियंत्रण समितीच्या अहवालाची आणि ३१ मे रोजी २०१७ च्या परिपत्रकाची होळी करण्यात आली.थरथरते हात, नजर कमजोरआंदोलनात सहभागी झालेल्या अनेकांचे हात थरथरत होते. अनेकांना चालणेही अवघड होत होते, तर अनेकांची नजरही कमजोर होती; परंतु काठीचा आणि नातेवाईकांचा आधार घेत ते आंदोलनात सहभागी झाले. अवघ्या २ ते ३ हजार रुपयांच्या पेन्शनमध्ये काय काय करायचे, असा सवाल पेन्शनधारकांनी उपस्थित केला.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादSocialसामाजिक