अनुदानासाठी ‘कलेक्टर’कडे धाव

By Admin | Updated: May 30, 2014 00:35 IST2014-05-29T23:59:38+5:302014-05-30T00:35:04+5:30

हिंगोली : सेनगाव तालुक्यातील ब्राह्मणवाडा येथील काही शेतकर्‍यांची नावे गारपीटग्रस्तांच्या यादी आली नाहीत.

For the grant, the collector has scored | अनुदानासाठी ‘कलेक्टर’कडे धाव

अनुदानासाठी ‘कलेक्टर’कडे धाव

 हिंगोली : सेनगाव तालुक्यातील ब्राह्मणवाडा येथील काही शेतकर्‍यांची नावे गारपीटग्रस्तांच्या यादी आली नाहीत. दरम्यान तहसील कार्यालयाच्या सांगण्यावरून ब्राह्मणवाडा येथील सरसकट सर्वच शेतकर्‍यांचे अनुदान वाटप गोरेगाव येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेने बंद केले आहे. त्यामुळे थांबविण्यात आलेले अनुदान वाटप तात्काळ सुरू करण्याची मागणी शेतकर्‍यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे. अनुदानाच्या यादीत नावे आली नसल्याने ब्राह्मणवाडा येथील काही शेतकर्‍यांनी सेनगाव येथील तहसील कार्यालयाकडे धाव घेतली होती. त्यावेळी तहसीलच्या सांगण्यावरून गोरेगाव येथील शाखेने शेतकर्‍यांचे अनुदान वाटप बंद केले. येत्या खरीप हंगामासाठी खत, बियाणे खरेदीसाठी उपयोगी पडणार्‍या अनुदानाची रक्कम थांबल्यामुळे गुरूवारी काही शेतकर्‍यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेवून मागणीचे निवेदन दिले. त्यात चुकून राहिलेल्या शेतकर्‍यांची नावे गारपीटग्रस्तांच्या यादीमध्ये समाविष्ट करण्याची मागणी केली आहे. परंतु काही शेतकर्‍यांसाठी उर्वरित २४८ लाभार्थ्यांचे अनुदान वाटप रोखून धरण्यात येवू नये. त्यामुळे गोरेगाव शाखेला अनुदान वाटप सुरू करण्याचे आदेश देण्याची मागणी या निवेदनात केली आहे. जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या या निवेदनावर ज्ञानबा वायचाळ, भगवान वायचाळ, शिवाजी वायचाळ, शिवाजी मेटकर, संजय पंडीत, दिलीप वायचाळ, जनार्धन वैद्य, उद्धव वायचाळ, जेमन कव्हर, संतोष आडे आदींची नावे आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: For the grant, the collector has scored