दहा हजारांची लाच घेताना ग्रामसेवक सापळ्यात

By Admin | Updated: February 9, 2016 00:23 IST2016-02-08T23:39:17+5:302016-02-09T00:23:11+5:30

जालना : बदनापूर तालुक्यातील पीरसावंगी येथील राष्ट्रीय पेयजल योजनेच्या कामासाठी दहा हजार रूपयांची लाच स्वीकारताना ग्रामसेवकास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने

Gramsevak caught a batch of ten thousand rupees | दहा हजारांची लाच घेताना ग्रामसेवक सापळ्यात

दहा हजारांची लाच घेताना ग्रामसेवक सापळ्यात


जालना : बदनापूर तालुक्यातील पीरसावंगी येथील राष्ट्रीय पेयजल योजनेच्या कामासाठी दहा हजार रूपयांची लाच स्वीकारताना ग्रामसेवकास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी बदनापूर शहरातील एका हॉटेलात रंगेहाथ पकडले.
पीरसावंगीत तक्रारदाराने राष्ट्रीय पेयजल योजनेतंर्गत पाण्याची टाकी व पाईपलाईनचे काम पूर्ण केले आहे. सदर कामाचा अंतिम निधी वर्ग करण्यासाठी व तसा ग्रामपंचायतीचा ठराव मिळण्यासाठी तक्राराने ग्रामसेवक नारायण लक्ष्मण सोळुंके यांच्याशी संपर्क साधला. सदर कामासाठी ग्रामसेवक सोळुंके यांनी तक्रारदाराकडे १० हजारांची लाचेची मागणी केली होती.
तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.
रोषणगाव फाटा येथे दहा हजारांची लाच घेताना पकडले. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक प्रवीण मोरे, पोलिस निरीक्षक व्ही. बी. चिंचोले, व्ही.एल.चव्हाण, किशोर पाटील, संतोष धायडे, अशोक टेहरे, शेंडिवाले, दौडे, आगलावे, संजय उदगीरकर, रामचंद्र कुदर, प्रदीप उबाळे यांनी केली.

Web Title: Gramsevak caught a batch of ten thousand rupees