शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

देवाचा निर्माता जगतोय उपेक्षेचे जीवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:09 IST

आळंद : दगडांवर छन्नी-हातोड्याचा घाव घालत देवमूर्ती निर्माण करणाऱ्या पाथरवट (वडार) समाजाची सध्या दुर्दशा झाली आहे. पूर्वी बारा बलुतेदारांमध्ये ...

आळंद : दगडांवर छन्नी-हातोड्याचा घाव घालत देवमूर्ती निर्माण करणाऱ्या पाथरवट (वडार) समाजाची सध्या दुर्दशा झाली आहे. पूर्वी बारा बलुतेदारांमध्ये अत्यंत महत्त्वाचे स्थान असलेला हा समाज दगडांपासून घडविलेले साहित्य विकून उदरनिर्वाह चालवायचा. मात्र, आताच्या काळात घरगुती वापरामध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वापर मोठ्या प्रमाणात वाढल्याने या समाजाला रोजीरोटीसाठी दाही दिशा भटकावे लागत आहे. करोडो लोक ज्यांच्यासमोर रोज नतमस्तक होतात, अशा देवाच्या मूर्तींना घडविणारा हा समाज सध्या अस्तित्वासाठी धडपडतोय.

भारतीय समाजरचनेत गावगाड्यातील बारा बलुतेदारांपैकी एक असलेला पाथरवट (वडार) समाज पूर्वीपासूनच दगडांपासून लेणी, शिल्प, देवांच्या मूर्ती, दगडी मंदिरे, तसेच घरगुती वापराच्या पाटा, वरवंटा, खलबत्ते, इत्यादी साहित्य, कलाकृती बनवून जीवन जगत असे. विशेष म्हणजे त्यांच्याशिवाय गाव अधुरे राहत होते. मात्र कालौघात पारंपरिक साधनांची जागा इलेक्ट्रॉनिक वस्तूंनी घेतल्यामुळे या समाजावर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. त्यामुळे बहुतांश भटका असलेल्या या समाजाला जीवन जगण्यासाठी मोलमजुरी करावी लागत आहे.

शासनाकडून मदतीची अपेक्षा

पाथरवट समाजाचा पारंपरिक धंदा बंद पडण्याच्या मार्गावर असून बहुतांश उत्कृष्ट कारागीर बेरोजगार झाले आहेत. छन्नी-हातोड्यांनी दगडांवर घाव घालून रट्टलेले हात पोटापाण्यासाठी मोलमजुरी करून जीवन जगत आहेत. जे लोक पारंपरिक व्यवसायाला चिकटून बसले आहेत, त्यांची परिस्थिती बिकट आहे. शासनाने या कलाकारांच्या कलेची कदर करून त्यांना मदत करावी. अन्यथा ही कला कालौघात नष्ट होईल. या कारागिरांना शासकीय अनुदान व इतर शासकीय योजनांचा लाभ मिळाल्यास त्यांच्या कलेला वाव मिळून समाजाची प्रगती होईल.

पाटा, वरवंट्याला मिळत नाहीत ग्राहक

सध्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे जग असून वेगवान व कोणत्याही कष्टाविना गृहिणी मिक्सरवर घरातील मसाले वाटून घेतात. पाटा, वरवंट्यावरील चव ही कितीही चांगली असली, तरी कष्ट घेण्याची तयारी नवीन पिढीमध्ये नसल्याने पाथरवटांच्या पाटा, वरवंट्याला मागणी घटली आहे. एव्हाना ती नसल्यातच जमा आहे. यामुळे या समाजावर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे.

कष्टाचे काम

पाथरवट समाज मोठमोठ्या दगडांवर घाव घालून आपल्या कलेचा वापर करून मूर्ती, पाटा, वरंवटा घडवितात. मात्र आता खाणीतून दगड आणणेही महाग झाले आहे. तसेच दगडांवर कित्येक तास हातोड्याचे घाव घालून या वस्तू घडविण्यासाठी मोठी मेहनत करावी लागते. त्यामानाने या वस्तूंना मागणी तर नाहीच. मात्र जे ग्राहक मिळतात तेही अत्यंत कमी किमतीत या वस्तू मागतात. यामुळे पाथरवट समाज अडचणीत सापडला आहे.

कोट

आमच्या कलेची शासन दरबारी नोंद नसल्याने ही कला लुप्त होत चालली आहे. शासनाने आमच्या कारागिरांची नोंद घेऊन आम्हाला शासकीय सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.

- शेषराव धोत्रे, कारागीर.

फोटो ओळ : आळंद (ता. फुलंब्री) येथे दगडापासून विविध वस्तू बनविताना कारागीर शेषराव धोत्रे.