शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
5
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
6
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
7
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
8
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
9
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
10
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
11
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
12
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
13
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
14
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
15
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
16
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
17
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
18
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
19
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
20
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

सोसायट्यांना ‘दे धक्का’

By admin | Updated: August 1, 2014 00:26 IST

चेतन धनुरे, लातूर राज्याच्या राजकारणात सहकार क्षेत्राचा मोठा दबदबा आहे़ गावस्तरावरील सोसायट्यांना राज्याच्या राजकारणाचा पायाच मानला गेला आहे़

चेतन धनुरे, लातूरराज्याच्या राजकारणात सहकार क्षेत्राचा मोठा दबदबा आहे़ गावस्तरावरील सोसायट्यांना राज्याच्या राजकारणाचा पायाच मानला गेला आहे़ लाखो शेतकऱ्यांची नाळ जुडलेल्या सोसायट्यांच्या निवडणुका मुदत संपूनही लागल्या नव्हत्या़ परंतु, गेल्या दोन वर्षांपासून रखडलेल्या निवडणुकांचा बार आता डिसेंबरनंतर उडणे निश्चित झाले असून, सहकारी निवडणूक प्राधिकरणने मुदत संपलेल्या सोसायट्यांची माहिती मागविणे सुरु केले आहे़ त्यात लातूर जिल्ह्यातील ५८३ सोसायट्यांचा समावेश आहे़लातूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्र समृद्ध आहे़ येथील राजकारणही वर्षानुवर्षे सहकार क्षेत्राभोवतीच एकवटलेले दिसून येते़ जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांची नाळ जोडलेल्या सोसायट्यांनी राजकारणात महत्वाची भूमिका बजावलेली आहे़ म्हणूनच राजकारणात सोसायट्यांना अनन्यसाधारण महत्व देण्यात आले आहे़ त्यामुळेच सोसायट्यांच्या निवडणुकांकडे मातब्बर राजकारण्यांचेही लक्ष लागून असते़ दरम्यान, लातूर जिल्ह्यात ४ हजारांवर सहकारी सोसायट्यांची स्थापना झालेली आहे़ त्यापैकी २५ टक्केपेक्षा अधिक म्हणजेच पाचशेवर सोसायट्यांची मुदत संपुष्टात येऊन दोन वर्षे उलटली आहेत़ परंतु, नवीन सहकार कायद्यानुसार निवडणुका घेण्यासाठी राज्य शासनाने सोसायट्यांना वेळोवेळी मुदतवाढ दिली़ नव्या सहकार कायद्यानुसार सोसायट्यांच्या निवडणुका घेण्यासाठी स्वतंत्र प्राधिकरणाची स्थापना करणे आवश्यक होते़ परंतु, त्यास विलंब झाल्याने सोसायट्यांना शासनाने डिसेंबर २०१४ पर्यंत मुदतवाढ दिली होती़ दरम्यान, आता प्राधिकरणाची स्थापना झाली असल्याने सोसायट्यांच्या निवडणूक प्रक्रियेला गती मिळाली आहे़ जिल्हास्तरावरुन मुदत संपलेल्या सोसायट्यांची माहिती प्राधिकरणकडून मागविली जात आहे़ त्यामुळे विधानसभेपाठोपाठ जिल्ह्यात आता सहकारी सोसायट्यांचा बार उडणार, हे निश्चित झाले आहे़५८३ सोसायट्या निवडणूकपात्ऱ़़लातूर जिल्ह्यात एकूण ४०४१ सहकारी सोसायट्या अस्तित्वात आहेत़ त्यापैकी ३०७१ प्रशासनिक तर ९७० सोसायट्या दुग्ध व मत्स्य व्यवसायाशी संबंधित आहेत़ या सोसायट्यांपैकी ५८३ सोसायट्यांची मुदत संपुष्टात आलेली असल्याने त्या निवडणूक पात्र ठरल्या आहेत़ यापैकी बहुतांश सोसायट्यांच्या मुदती दोन वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून संपलेल्या आहेत़ मात्र शासनाने वेळोवेळी मुदतवाढ दिल्याने त्यांच्या निवडणुका रखडल्या होत्या़ आता या सोसायट्यांच्या निवडणुकांना ‘धक्का’ मिळाला आहे़नवीन सहकार कायद्यानुसार निवडणुका घ्यावयाच्या असल्याने सोसायट्यांच्या निवडणुका रखडल्या होत्या़ आता राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाची स्थापना झाली आहे़ या प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून काम पाहत असलेले निवृत्त सहकार आयुक्त मधुकरराव चौधरी यांनी मुदत संपलेल्या सोसायट्यांची माहिती मागविली आहे़ त्यानुसार संबंधित माहिती एकत्र करुन प्राधिकरणास पाठवीत आहोत़- मधुकर गुंजकर, सहायक निबंधक, प्रशासन