शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
4
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
5
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
6
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
7
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
8
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
9
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
10
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
11
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
12
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
13
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
14
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
15
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
16
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
17
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
18
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
19
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
Daily Top 2Weekly Top 5

मोक्याच्या जागांवर उद्यानाची आरक्षणे

By admin | Updated: December 30, 2015 00:48 IST

औरंगाबाद : सुधारित शहर विकास आराखड्यात अनेक ठिकाणी मोक्याच्या जागांवर उद्यानाची आरक्षणे टाकण्यात आल्याचे समोर आले आहे.

औरंगाबाद : सुधारित शहर विकास आराखड्यात अनेक ठिकाणी मोक्याच्या जागांवर उद्यानाची आरक्षणे टाकण्यात आल्याचे समोर आले आहे. काही ठिकाणी तर अगदी चौकांमध्येच रस्त्यालगतच्या जागा उद्यानासाठी आरक्षित केल्या आहेत. परिणामी व्यावसायिक वापराच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठरणाऱ्या या जागा हातच्या जाणार आहेत. शहराचा सुधारित विकास आराखडा सोमवारी मनपाच्या सर्वसाधारण सभेसमोर ठेवण्यात आला. आगामी सर्वसाधारण सभेनंतर तो जनतेसाठी प्रसिद्ध होणार आहे. पण तरीही त्यातील अनेक बाबी हळूहळू समोर येत आहेत. सुधारित आराखड्यात गार्डनची आरक्षणे टाकताना जागांचे महत्त्व, त्यांची उपयोगिता याचा विचार झालेला नाही. अनेक ठिकाणी अगदी मोक्याच्या जागांवरच अशा उद्यानांची आरक्षणे टाकली गेली आहेत. नक्षत्रवाडी, मुस्तफाबाद, चिकलठाणा, हर्सूल आदी भागात असे प्रकार घडले आहेत. काही ठिकाणी चौकांमधील कोपऱ्यावरील जागेत तर काही ठिकाणी दोनशे फूट रुंद रस्त्यालगतच्या जागांमध्ये ही आरक्षणे आहेत. त्यामुळे अशा जमीनमालकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. चौकांमधील किंवा मोठ्या रस्त्यांलगतच्या जागा या व्यावसायिक वापराच्या दृष्टीने महत्त्वाच्या समजल्या जातात. त्याऐवजी अशी आरक्षणे टाकली गेल्यामुळे त्यावर मोठ्या प्रमाणावर आक्षेप घेतले जाण्याची शक्यता आहे. एअरपोर्टसाठी १४० हेक्टर सुधारित विकास आराखड्यात विमानतळाच्या विस्तारीकरणाचाही विचार करण्यात आलेला आहे. विमानतळ प्राधिकरणाच्या विनंतीवरून आराखड्यात १४० हेक्टर जागा आरक्षित करण्यात आली आहे. भविष्यात या ठिकाणी विमानतळाचे विस्तारीकरण होणार आहे. विमानतळाच्या भिंतीपासून एसटी कॉलनीच्या दिशेने या जागेचे आरक्षण आहे. मनपाचे प्राणिसंग्रहालय मोठ्या जागेत स्थलांतरित करण्याच्या हालचाली अनेक दिवसांपासून सुरू आहेत. त्यासाठी मनपाने जिल्हा प्रशासनाकडे जागेची मागणीही नोंदविलेली आहे.४या पार्श्वभूमीवर सुधारित विकास आराखड्यात मिटमिटा परिसरात तब्बल २०० एकर जागा आरक्षित केली आहे. याशिवाय ट्रान्स्पोर्ट नगरसाठी जळगाव रोडवर हर्सूलच्या पुढे जागा आरक्षित करण्यात आली आहे. सुधारित विकास आराखडा मनपाला सादर करण्यात आला असला तरी नगररचना खात्याने विद्यमान जमीन वापराचा नकाशा नागरिकांसाठी उपलब्ध करून दिलेला नाही. त्यामुळे विकास आराखडा प्रसिद्ध झाला तरी सध्या कोणत्या जागेवर काय आहे आणि त्यात कोणता बदल झाला आहे हे नागरिकांना समजू शकणार नाही. त्यामुळे आधी विद्यमान जमीन वापर नकाशा बोर्डवर लावण्याची मागणी होत आहे.