छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांना जिल्हा वार्षिक योजनेतून शासनाकडून ६ हजार २३१ कोटी मिळावेत, अशी मागणी सर्व यंत्रणांनी केली होती. मात्र, शासनाने ३ हजार ९३५ कोटींचा निधी विभागाच्या पदरात टाकला.
शासनाच्या आर्थिक मर्यादेपेक्षा अधिकचा निधी मिळाल्याचे आकड्यांतून दिसत असले, तरी जिल्ह्यांनी केलेल्या मागणीच्या तुलनेत कमी निधी मिळाला. ‘लाडकी बहीण’सारख्या योजनांमुळे फटका बसल्याचे बोलले जात असून, सगळ्याच खात्यांच्या निधीला कात्री लावण्याच्या धोरणाचा दणका मराठवाड्याच्या सर्व जिल्हा नियोजन समित्यांना बसल्याचे यातून दिसते आहे. ३,२५७ कोटी रुपयांची अतिरिक्त मागणी मराठवाड्यातील आठही जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून पालकमंत्र्यांनी केली होती. २ हजार ९७३ कोटींची शासकीय मर्यादा हाेती. त्यात ९६१ कोटींची भर शासनान टाकली. मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगरसाठी १,२०० कोटी रुपयांची मागणी होती. शासनाने ७३५ कोटी रुपयांना मंजुरी दिली. मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांतील वाढलेली लोकसंख्या, आवश्यक सुविधा विचारात घेऊन जिल्हा प्रशासनांनी फेब्रुवारी महिन्यात वित्त आणि नियोजन विभागाकडे प्रस्ताव सादर केले होते.
मागील तीन वर्षांतील सरासरी निधी२०२३-२४ : २ हजार ४५ कोटी२०२४-२५ : ३ हजार ४९० कोटी२०२५-२६ : ३ हजार ९३५ कोटी
जिल्हा वार्षिक योजना २०२५-२६ साठी मंजूर केलेला निधी (कोटीत)जिल्हा.................... आर्थिक मर्यादा..................अतिरिक्त मागणी ......एकूण प्रस्ताव ...........अंतिम मंजुरी
छत्रपती संभाजीनगर........५१६ कोटी..................६८३ कोटी.............१,२००...........७३५जालना........................३३२ कोटी ..................२६७ कोटी ...........६००...........४३६
परभणी........................२९५ कोटी....................५४० कोटी..............८३५...........३८५नांदेड..........................४७७ कोटी .................४७० कोटी ...........९४८...........५८७
बीड........................४४६ कोटी.....................१९५ कोटी ...............६४१...........५७५लातूर.........................३६१ कोटी .....................२५५ कोटी..............६१६...........४४९
धाराशिव.....................३५८ कोटी ......................२७२ कोटी...........६३०...........४५७हिंगोली.......................१८६ कोटी .......................५७१ कोटी............७५८...........३११
एकूण........................२,९७३ कोटी......................३,२५७ कोटी..........६,२३१ कोटी...........३,९३५ कोटी