शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

राजेंद्र दर्डा यांची प्रचारात आघाडी

By admin | Updated: September 29, 2014 00:43 IST

औरंगाबाद : पदयात्रांच्या धडाक्याने प्रचाराला सुरुवात करून राजेंद्र दर्डा यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे.

औरंगाबाद : पदयात्रांच्या धडाक्याने प्रचाराला सुरुवात करून राजेंद्र दर्डा यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. शनिवारच्या पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळल्यानंतर रविवारी सकाळी राजेंद्र दर्डा यांनी मायानगर, ठाकरेनगर, राजीव गांधीनगर आणि जयभवानीनगर या भागांमध्ये पदयात्रा काढली. पदयात्रेत सहभागी झालेल्या युवा कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता संपूर्ण परिसरात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते. सकाळी ८.३० वाजता राजेंद्र दर्डा जसे मायानगर भागात पोहोचले, तसे कार्यकर्त्यांनी फटाक्यांच्या आतषबाजीत व फुलांच्या वर्षावात त्यांचे स्वागत केले. शेकडो कार्यकर्ते गळ्यात काँग्रेसच्या पताका, हातात तिरंगी झेंडे घेऊन पदयात्रेत सहभागी झाले होते. पदयात्रा ठाकरेनगरात पोहोचल्यानंतर विठ्ठल-रुख्माई मंदिरात राजेंद्र दर्डा यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. औरंगाबादच्या सर्वांगीण विकासासाठी राजेंद्र दर्डा यांना निवडून देण्याचे साकडे रहिवाशांनी विठ्ठलाला घातले. त्यानंतर पदयात्रा मुकुंद सोसायटी या भागात पोहोचली. परिसरातील महिलांनी राजेंद्र दर्डा यांच्या पदयात्रेचे दारात रांगोळी काढून स्वागत केले. तसेच राजेंद्र दर्डा यांना औक्षण करून विजयासाठी शुभेच्छा दिल्या. ‘जय हो’च्या घोषणांनी आणि ढोल- ताशांच्या गजरात निघालेली पदयात्रा राजीव गांधीनगरात पोहोचल्यानंतर कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. राजेंद्र दर्डा यांनी परिसरातील प्रत्येक घरात जाऊन मतदान करण्याचे आवाहन केले. सकाळी ११ वाजता राजेंद्र दर्डा यांची प्रचार रॅली संत तुकोबानगरात पोहोचली. परिसरातील शेकडो कार्यकर्ते या रॅलीत मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते. पुढे कामगार चौकापासून रॅली जयभवानीनगरात पोहोचताच फटाक्यांच्या आतषबाजीने रॅलीचे स्वागत करण्यात आले. येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला राजेंद्र दर्डा यांनी अभिवादन केले. त्यानंतर जयभवानीनगरातील गल्ल्यांमध्ये घरोघर जाऊन राजेंद्र दर्डा यांनी मतदारांच्या भेटी घेतल्या. सकाळी ११.३० वाजता रॅलीचा समारोप करण्यात आला. या पदयात्रेत काँग्रेसचे नगरसेवक, कार्यकर्ते, युवक, महिला आणि समर्थकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.बायजीपुरा, इंदिरानगरात जल्लोषराजेंद्र दर्डा यांची पदयात्रा दुपारी ४.३० वाजता जशी बायजीपुरा भागात पोहोचली तसा युवा कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीने कार्यकर्ते व समर्थकांनी राजेंद्र दर्डा यांचे स्वागत केले. एमजीएम कॅम्पसपासून सुरू झालेली पदयात्रा जशी बायजीपुरा व इंदिरानगरात पुढे जात होती, तसा कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला होता. पुढे मोठ्या संख्येने कार्यकर्ते रॅलीत सहभागी झाले. पदयात्रेदरम्यान राजेंद्र दर्डा हे प्रत्येक मतदारांशी संवाद साधत होते. अनेक घरांमध्ये जाऊन त्यांनी थोरा-मोठ्यांच्या दुवा आणि आशीर्वाद घेतले. विशेष म्हणजे महिला व युवकांनी त्यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या. पुढे पदयात्रा इंदिरानगर भागात पोहोचली. पदयात्रेत लहान मुलांचा उत्साहदेखील पाहण्याासारखा होता. काँग्रेसच्या विविध घोषणा देत त्यांनी परिसर दणाणून सोडला होता. सायंकाळी ७.४० वाजता पदयात्रेचा समारोप झाला. आज पुंडलिकनगर, हनुमाननगर, रोशनगेट येथे पदयात्राऔरंगाबाद पूर्वचे काँग्रेसचे उमेदवार राजेंद्र दर्डा यांच्या प्रचारानिमित्त आज सकाळी ८.३० ते ११.३० यावेळेत पदयात्रा काढण्यात येणार आहे. वॉर्ड क्र. ८३ पुंडलिकनगर, हनुमाननगर या भागात राजेंद्र दर्डा यांची पदयात्रा निघेल. पदयात्रेचा मार्ग असा राहील. हनुमान मंदिर हनुमाननगर येथून सुरुवात. पुढे गल्ली नं. ५, त्यानंतर ४, ३, २, १, हनुमाननगर- न्यू हनुमाननगर पूर्ण, पुंडलिकनगर गल्ली नं. १० ते गल्ली नं. १- मातोश्रीनगर पूर्ण. सायंकाळी ४.३० ते ८ या वेळेतील पदयात्रेचा मार्ग- गंजेशहिदा मशीद- मुस्कान हॉल गल्ली- फातेमा स्कूल गल्ली पूर्ण- नागसेन कॉलनी- कलीम कुरेशी गल्ली- सिद्धेश्वर कॉलनी- बशीर बिलोटी- सलीम पटेल गल्ली- पटेल कॉलनी- मिनारा गल्ली- मिनार मशीद गल्ली नं. १.