शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या नांदेडसाठी स्वतंत्र जलशुद्धीकरण केंद्र

By admin | Updated: June 24, 2017 23:49 IST

नांदेड: गेल्या दहा वर्षांपासून दूषित पाणीपुरवठ्याची समस्या असलेल्या जुन्या नांदेडचा प्रश्न आता सुटणार आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: गेल्या दहा वर्षांपासून दूषित पाणीपुरवठ्याची समस्या असलेल्या जुन्या नांदेडचा प्रश्न आता सुटणार आहे़ मनपाच्या सर्वसाधारण सभेने जुने नांदेड भागात ३५ एमएलडी क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यास एकमुखाने मंजुरी दिली असून त्यामुळे या भागातील जवळपास दोन लाख नागरिकांना आता शुद्ध पाणीपुरवठा होणार आहे़ नांदेड शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे़ शहराला लागून असलेल्या नवीन वस्त्यांची पाण्याची मागणीही वाढत चालली आहे़ एकट्या विष्णूपुरीवर नांदेडची तहान भागविणे अशक्य असल्यामुळे आसनातून पर्यायी पाणीपुरवठ्याची व्यवस्था करण्यात आली आहे़ आजघडीला शहरात डंकीन येथे २७ एमएलडी, काबरानगर येथे ३५ व ६० एमएलडी असे दोन, असदवन येथे ३५ एमएलडी अशी एकूण चार जलशुद्धीकरण केंदे्र आहेत़ त्या केंद्रातूनच नांदेडकरांची तहान भागविण्यात येते़ डंकीन केंद्रातून रेल्वेस्टेशन, गोकुळनगर, शिवाजीनगर, काबरानगर येथून उत्तर नांदेडला तर असदवन येथील जलशुद्धीकरण केंद्रातून नवीन नांदेड आणि जुन्या नांदेड भागात पाणीपुरवठा करण्यात येतो़ असदवन येथील केंद्रातून नवीन नांदेडला पाणीपुरवठा केल्यानंतर जुन्या नांदेडसाठी पाणी सोडण्यात येते़ त्यामुळे जवळपास दोन लाख लोकसंख्या असलेल्या या भागात सणासुदीच्या काळातही पाणीटंचाईचा तसेच दूषित पाणीपुरवठ्याचा सामना करावा लागत होता़ गुरु-त्ता-गद्दीच्या काळात नांदेडात पाणीपुरवठ्याचे काम करण्यात आले होते़ परंतु त्याहीवेळी जुन्या नांदेड भागासाठी तात्पुरती व्यवस्था असदवन येथूनच करण्यात आली आहे़ विशेष म्हणजे, जुन्या नांदेड भागातील जलवाहिन्या या अनेक वर्षांपूर्वीच्या असून ठिकठिकाणी त्याला गळती लागली आहे़ त्यामुळे या भागाला गेल्या दहा वर्षांपासून सातत्याने दूषित पाणीपुरवठ्याची समस्या भेडसावत होती़ याबाबत अनेकवेळा या भागातील नागरिकांनी आंदोलनेही केली़ पाणीपुरवठ्याच्या या समस्येबाबत पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता रफतउल्लाखान यांनी नवीन जलशुद्धीकरण केंद्राचा प्रस्ताव ठेवला होता़ या प्रस्तावाला नगरसेवकांनीही उचलून धरले़ या विषयावर मनपाच्या सर्वसाधारण सभेनेही सकारात्मक भूमिका घेत जुन्या नांदेड भागासाठी ३५ एमएलडी जलशुद्धीकरण केंद्राच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे़ हा प्रस्ताव पुढील मंजुरीसाठी पाठविण्यात येणार असून लवकरच या भागात जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात येणार आहे़ त्यामुळे वर्षानुवर्षांचा जुन्या नांदेडातील रहिवाशांचा दूषित पाणीपुरवठ्याचा प्रश्न मिटणार आहे़