शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

महागड्या वस्तूंचे आमिष दाखवून फसवणूक

By admin | Updated: November 2, 2014 00:23 IST

औरंगाबाद : किलेअर्क पंचकुवा येथील बुद्धविहाराजवळ काही सेल्समन व सेल्सगर्ल लोकांना आकर्षक स्कीमचे आमिष दाखवीत आहेत.

औरंगाबाद : किलेअर्क पंचकुवा येथील बुद्धविहाराजवळ काही सेल्समन व सेल्सगर्ल लोकांना आकर्षक स्कीमचे आमिष दाखवीत आहेत. कंपनीचे मेंबर बनवून त्यांना कूपन देत आहेत. या पैसे घेऊन फसवणूक करणाऱ्या सेल्समन व सेल्सगर्लवर गुन्हे शाखेने कारवाई केली आहे.काही जण नागरिकांना महागड्या वस्तूंचे आमिष दाखवून फसवणूक करीत असल्याची माहिती गुन्हे शाखेचे फौजदार सुरेश खाडे यांना मिळाली. त्यावरून टीमने घटनास्थळी दाखल होऊन सखोल चौकशी केली असता युनायटेड टेली शॉप इलेक्ट्रॉनिक प्रॉडक्टचे अ‍ॅपलर्स मार्केटिंगकडून आलो आहोत. त्यांच्याकडे एक स्कीम आहे. त्यात तुम्हाला मेंबर बनविले जात आहे. मेंबरशिपचे कार्ड घेऊन आमच्या कंपनीच्या पहिल्या कार्डच्या मागील चित्रित केलेल्या वस्तूंपैकी ज्यात एलईडी टीव्ही, मिक्सर, गॅस शेगडी, इस्त्री, डीव्हीडी प्लेअर, इंडक्शन कुकर, हेअर ड्रायर, मसाजर अशा महागड्या वस्तू तुम्हास ताबडतोब येथेच मिळतील. त्या बदल्यात ५०० रुपये द्यावे लागतील. कार्ड रिकामे निघाल्यास काहीही पैसे भरावे लागणार नाहीत. अशा महागड्या वस्तूंचे आमिष दाखविण्यास सुरुवात केली. त्यांच्या बॅगमधील वस्तूंची तपासणी केली असता, स्वस्तातील वस्तू आढळून आल्याने त्यावरून सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. कृष्णा राजकुमार नामदेव (२४, रा. बी-२६, वंदनानगर, इंदौर, ह.मु. बजाजनगर), शेख हमीद शेख हलीम (२३, कान्हा कुंज, भोपाळ, ह.मु. बजाजनगर), चेतन राजेश फुले (१९, रा. गणेशनगर, परतूर, ह.मु. दत्तनगर, रांजणगाव), अश्विनी सुभाष इंगळे (२४, रा. गिंभा, मोहरी, वाशिम, ह.मु. मोहटादेवी मंदिरासमोर, अयोध्यानगर), पूजा विष्णू वाळुके (२२, रा. विजयनगर, मेहकर, ह.मु. साईश्रद्धापार्क, बजाजनगर) यांच्याकडून ३६ हजार ६३७ रुपयांच्या वस्तू मिळून आल्या असून, जनतेला आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.