रोपांचे बिल काढून देण्यासाठी वनपालाने घेतली एक हजाराची लाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:08 IST2021-02-05T04:08:43+5:302021-02-05T04:08:43+5:30

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सामाजिक वनीकरण परिक्षेत्र कन्नडचे वनपाल भगवान कौतिकराव मगर यांनी तक्रारदार यांचे रोपांचे व खतांचे बिल ...

The forest ranger took a bribe of Rs | रोपांचे बिल काढून देण्यासाठी वनपालाने घेतली एक हजाराची लाच

रोपांचे बिल काढून देण्यासाठी वनपालाने घेतली एक हजाराची लाच

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सामाजिक वनीकरण परिक्षेत्र कन्नडचे वनपाल भगवान कौतिकराव मगर यांनी तक्रारदार यांचे रोपांचे व खतांचे बिल काढून देण्यासाठी दोन हजार रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती एक हजार रुपये देण्याचे ठरले. तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारीची खातरजमा केल्यानंतर बुधवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने चिंचोली लिंबाजी येथे सापळा रचला. एक हजार रुपयांची लाच घेताना मगर यास रंगेहाथ पकडले. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. राहुल खाडे, अपर पोलीस अधीक्षक अनिता जमादार, उपअधीक्षक ब्रह्मदेव गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. नि. शुभांगी सूर्यवंशी, पो.ना. बाळासाहेब राठोड, पो. कॉन्स्टेबल राजेंद्र सीनकर, चांगदेव बागुल यांनी ही कारवाई केली. पिशोर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: The forest ranger took a bribe of Rs