शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
3
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
4
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
5
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
6
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
7
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
8
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
9
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
10
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
11
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
12
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
13
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
14
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
15
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
16
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
17
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
18
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
19
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
20
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
Daily Top 2Weekly Top 5

चारा संपला, प्रशासन सुस्त !

By admin | Updated: July 12, 2015 00:45 IST

हरी मोकाशे ,लातूर गेल्या वर्षी अल्प पर्जन्यमान झाल्याने आणि यंदा पावसाने दडी मारल्याने पशूधनाच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे़ जिल्ह्यात उपलब्ध असलेला

हरी मोकाशे ,लातूरगेल्या वर्षी अल्प पर्जन्यमान झाल्याने आणि यंदा पावसाने दडी मारल्याने पशूधनाच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे़ जिल्ह्यात उपलब्ध असलेला ७ लाख ८२ हजार ६४७ मे़ टन चारा संपुष्टात आला आहे़ परिणामी, पशूधनाच्या दावणीला ऊसाचे वाळलेले पाचट टाकले जात आहे़ जीवापाड सांभाळलेले पशूधन आता जगवायचे कसे असा यक्ष प्रश्न पशूपालकांसमोर असताना जिल्हा प्रशासन मात्र सुस्त असल्याचे पहावयास मिळत आहे़ त्यामुळे जिल्ह्यातील पशूधन संख्या घटण्याची भिती व्यक्त होत आहे़जिल्ह्यात गेल्या वर्षी विलंबाने व अल्प पर्जन्यमान झाले़ त्यामुळे शेतकऱ्यांना खरीप हंगाम अपेक्षितरित्या साधला नाही़ रबी तरी पदरी पडेल अशी शेतकऱ्यांनी आशा होती़ परंतु, वरुणराजाने पाठ फिरविल्याने त्या आशेवर पाणी फिरले़ पाऊसच नसल्याने रबी हंगामातून दरवर्षीच्या तुलनेत अल्प चारा उपलब्ध झाला़ तो म्हणजे केवळ १ लाख ५ हजार ३०१ मे़ टन होय़ जिल्ह्यात लहान पशूधनाची संख्या १ लाख ४४ हजार ९३२ तर मोठ्या पशूधनाची संख्या ४ लाख ५५ हजार २१८ अशी आहे़जिल्ह्यातील पशूधनास दररोज ३ हजार १६६ किलो चारा लागतो़ जिल्ह्यास वार्षिक चारा ११ लाख ३९ हजार ७९७ मे़ टन लागतो़ त्याच्या तुलनेत जिल्ह्यात उन्हाळ्याचा अखेरपर्यंत केवळ ७ लाख ८२ हजार ६४७ मे़ टन चारा उपलब्ध झाला होता़ यंदा वेळेवर पाऊस होईल, या आशेने पशूपालकांनी भर उन्हाळ्यात मोठ्या कष्टाने पशूधन सांभाळले़ मृग नक्षत्राच्या प्रारंभी उदगीर, जळकोट, रेणापूर या तालुक्यांत पावसाच्या चांगल्या सरी झाल्या़ जिल्ह्यात जून अखेरपर्यंत सरासरी ८७़५८ मिमी पाऊस झाला तर जुलैत आजपर्यंत ८़८२ मिमी झाला आहे़दरवर्षी जुलैमध्ये माळराने हिरवीगार दिसतात़ परंतु, यंदा पाऊसच नसल्याने माळराने ओसाड दिसून येत आहेत़ त्यामुळे पशूधनास हिरवा चारा उपलब्ध नाही़ कडबाही संपुष्टात आल्याने पशूपालक धास्तावला आहे़ जीवापाड सांभाळलेले पशूधन आता कसे जगवायचे असा प्रश्न सतावत आहे़ जिल्हा प्रशासन मात्र कुठलीही ठोस उपाययोजना करीत नसल्याचे दिसून येत आहे़ परिणामी, जिल्ह्यातील पशूधन संख्या घटण्याची भिती व्यक्त होत आहे़चारा संपुष्टात आला आहे़ त्यामुळे पशूपालक चिंतातूर झाले आहे़ चारा छावणी संदर्भात प्रस्ताव महसूलच्या अधिकाऱ्यांमार्फत मागविण्यात येत आहेत, असे पशूसंवर्धन विकास अधिकारी डॉ़ एल़ एस़ पवार यांनी सांगितले़