आधी मोबाईल जाळला, मग प्रेयसीचा जीव घेतला! भीषण हत्याकांडात प्रियकराला मरेपर्यंत कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 19:11 IST2026-01-20T19:09:38+5:302026-01-20T19:11:42+5:30

मुकुंदवाडीतील त्या भीषण हत्याकांडाचा निकाल; दुसऱ्यासोबत प्रेमप्रकरण सुरू असल्याच्या संशयावरून केला होता खून

First he burned her mobile phone, then he took her own life! Boyfriend who murdered his girlfriend remanded in custody till death | आधी मोबाईल जाळला, मग प्रेयसीचा जीव घेतला! भीषण हत्याकांडात प्रियकराला मरेपर्यंत कोठडी

आधी मोबाईल जाळला, मग प्रेयसीचा जीव घेतला! भीषण हत्याकांडात प्रियकराला मरेपर्यंत कोठडी

छत्रपती संभाजीनगर : दुसऱ्यासोबत प्रेमप्रकरण सुरू असल्याच्या संशयावरून प्रेयसीचा गळा आवळून खून करणारा प्रियकर तथा आरोपी भोलाकुमार कुंजल मास्टर कुमार (२८, रा. गोरखपूर, उत्तरप्रदेश ह.मु. स्वराजनगर, मुकुंदवाडी) याला सत्र न्यायाधीश आर. डी. खेडेकर यांनी सोमवारी (दि.१९ जानेवारी) जन्मठेप आणि १० हजार रुपये दंड ठोठावला.

घटनेची पार्श्वभूमी
राहुल बरखू राय (२०, रा. मुकुंदवाडी) याने दिलेल्या फिर्यादीनुसार, राहुल कुटुंबासह मुकुंदवाडीतील स्वराजनगर येथे राहतो. आरोपी भोलाकुमार देखील त्यांच्यासोबत राहत होता. घटनेतील मृत महिला आणि भोलाकुमार यांचे प्रेमप्रकरण होते. परंतु सदर महिलेचे दुसऱ्यासोबत प्रेमप्रकरण सुरू असल्याचा भोलाकुमारला संशय होता. यावरून महिला व भोलाकुमार यांच्यात वाद झाला होता. वादानंतर भोलाकुमारने तिचा मोबाइल जाळला होता. या प्रेमप्रकरणाची कुणकुण लागताच राहुलचा मोठा भाऊ सुनील याने भोलाकुमार याला दुसरीकडे रुम बघण्यास सांगितले होते. त्यानुसार भोलाकुमार स्वराजनगर येथे किरायाने राहण्यासाठी गेला होता.

प्रेयसीने सोडल्याच्या रागातून खून
प्रेयसीने आपल्याला सोडल्याचा राग भोलाकुमारच्या मनात होता. त्याने ८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास प्रेयसीला मारहाण केली. त्यानंतर ओढणीने गळा आवळून तिचा खून केला व मृतदेह गुंडाळून मैदानात आणून टाकला. सदर महिला घरी आली नाही म्हणून आरोपी फिर्यादीसोबत तिला शोधण्यासाठी फिरला. दुसऱ्या दिवशी पहाटे दूध घेऊन जात असलेल्या महिलेला तिचा मृतदेह आढळला होता. याबाबत मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

खटल्याची सुनावणी व शिक्षा
खटल्याच्या सुनावणीवेळी सहायक सरकारी लोकअभियोक्ता अरविंद बागुल यांनी ११ साक्षीदारांचे जबाब नोंदविले. त्यातील ३ जणांची साक्ष महत्त्वाची ठरली. सुनावणीअंती न्यायालयाने भादंवि कलम ३०२ अन्वये आरोपीला वरीलप्रमाणे शिक्षा व दंड ठोठावला. दंड न भरल्यास त्याला अतिरिक्त ३ महिन्यांची सक्तमजुरीची शिक्षा भोगावी लागेल, असे आदेशात म्हटले आहे.

Web Title : प्रेमी ने मोबाइल जलाकर प्रेमिका की हत्या की; आजीवन कारावास

Web Summary : छत्रपति संभाजीनगर में एक ईर्ष्यालु व्यक्ति ने बेवफाई के शक में अपनी प्रेमिका की हत्या कर दी। उसने पहले उसका फोन जलाया, फिर गला घोंट दिया। अदालत ने उसे आजीवन कारावास और ₹10,000 का जुर्माना लगाया।

Web Title : Jealous Lover Kills Girlfriend After Burning Phone; Gets Life Sentence.

Web Summary : A jelaous man in Chhatrapati Sambhajinagar murdered his girlfriend suspecting infidelity. He first burned her phone, then strangled her. The court sentenced him to life imprisonment and a fine of ₹10,000 for the brutal crime.