शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

महानगरपालिकेचे अग्निशमन झोपेत !

By admin | Updated: June 1, 2014 00:24 IST

लातूर : येथील महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या झोपेचा फटका शहरातील एका रुग्णालयास शुक्रवारी मध्यरात्री बसला़

लातूर : येथील महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या झोपेचा फटका शहरातील एका रुग्णालयास शुक्रवारी मध्यरात्री बसला़ रुग्णालयास आग लागल्यानंतर नागरिकांनी गांधी चौकातील अग्निशमन कार्यालयाकडे धाव घेतली असता चालक नसल्याचे सांगून त्यांना माघारी पाठविले़ त्यामुळे आगीत रुग्णालयाचे मोठे नुकसान झाले आहे़ लातूरच्या आदर्श कॉलनीत डॉ़अजय मैंदरकर यांचे अ‍ॅक्सिडेंट हॉस्पिटल आहे़ प्रकृतीच्या कारणामुळे डॉ़मैंदरकर या रुग्णालयात गेल्या २ वर्षांपासून रुग्ण दाखल करुन घेत नाहीत़ मात्र याठिकाणी फर्निचर व वैद्यकीय यंत्रसामग्री अस्तिवात आहे़ दरम्यान, शुक्रवारी मध्यरात्री ११़३० वाजण्याच्या सुमारास या रुग्णालयास शॉर्टसर्किटमुळे आग लागली़ रुग्णालयास खेटूनच असलेल्या घरातील लाईट अचानक गेल्यामुळे कुटुंबियांनी बाहेर येऊन पाहिले असता रुग्णालयातून आगीचे लोट बाहेर पडताना दिसत होते़ त्यामुळे सर्वजण घराबाहेर पडले़ ही घटना कळविण्यासाठी तातडीने अग्निशमन दलाच्या कार्यालयात दूरध्वनी करण्यात आला़ मात्र तेथून प्रतिसाद मिळाला नसल्याने डॉ़मैंदरकर यांचे लहान बंधू स्वत: गांधी चौकातील कार्यालयात गेले होते़ मात्र याठिकाणी चालक नसल्याचे सांगून त्यांची बोळवण करण्यात आली़ त्यामुळे एमआयडीसीतील अग्निशमन कर्यालयात जाऊन तेथून वाहन नेण्यात आले़ तोपर्यंत २० ते २५ मिनिटे वेळ झाला होता़ त्यामुळे हॉस्पिटलमधील फर्निचर, वैद्यकीय यंत्रसामुग्री आगीमुळे नुकसानग्रस्त झाली़ या घटनेत अंदाजे २ लाखांपर्यंत नुकसान झाल्याचा दावा डॉ़अजय मैंदरकर यांनी केला आहे़ दरम्यान, अग्निशमन दलाचे वाहन येईपर्यंत आसपासच्या नागरिकांनी आग बरीच आटोक्यात आणली होती़ त्यानंतर अग्निशमनच्या जवानांनी उर्वरित काम पूर्ण केले़ (प्रतिनिधी)उन्हाळ्याच्या दिवसांत आगीच्या घटना सर्वाधिक घडतात, ही वस्तूस्थिती आहे़ असे असतानाही अग्निशमन दलाच्या कार्यालयात दूरध्वनीवरुन प्रतिसाद मिळत नाही़ शिवाय, समक्ष गेल्यानंतरही चालक नसल्याची सबब सांगितली जाते़ रुग्णालयास लागलेली आग गंभीर असतानाही कर्मचारी मात्र ही घटना गांभिर्याने घेत नसल्याचेच समोर आले आहे़