एपीआय प्रदीप काकडेंविरुध्द गुन्हा दाखल

By Admin | Updated: November 29, 2014 00:29 IST2014-11-29T00:16:53+5:302014-11-29T00:29:11+5:30

लातूर : येथील एमआयडीसी पोलिस ठाण्याचे तत्कालीन सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रदीप काकडे यांच्याविरुध्द त्याच पोलिस ठाण्यात शुक्रवारी न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल झाला आहे.

An FIR has been filed against Pradeep Kakade | एपीआय प्रदीप काकडेंविरुध्द गुन्हा दाखल

एपीआय प्रदीप काकडेंविरुध्द गुन्हा दाखल



लातूर : येथील एमआयडीसी पोलिस ठाण्याचे तत्कालीन सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रदीप काकडे यांच्याविरुध्द त्याच पोलिस ठाण्यात शुक्रवारी न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल झाला आहे. या आदेशाचीही तब्बल नऊ महिन्यानंतर अंमलबजावणी करण्यात आली आहे. दोन मुलींना खोटे पत्ते असतानाही पासपोर्टच्या अर्जासाठी खरे असल्याचे प्रमाणित केल्यावरुन ही कारवाई झाली आहे.
पोलिस सूत्राच्या माहितीनुसार एमआयडीसी पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलिस निरीक्षक काकडे यांच्या कालावधीत पूजा व श्रुती दीपक पाठक या दोन मुलींना पासपोर्ट साठी अर्ज केला होता. त्यांच्या अर्जावर पत्ता असलेल्याच्या प्रमाणपत्राला २९, ३० एमआयडीसी, लातूर हा पत्ता होता. या दोन्ही मुली त्या पत्त्यावर रहात नसतानाही पोलिस निरीक्षक काकडे यांनी ते प्रमाणित केले होते. यासंदर्भात मुलीचे पिता दीपक पाठक यांनी न्यायालयात प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सातवे यांच्यासमोर अर्ज दाखल केला होता. या अर्जात खोटा पत्ता प्रमाणित करणारे पोलिस निरीक्षक आणि पोलिस अधिक्षक यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची विनंती केली होती. त्यांचा अर्ज ग्राह्य धरुन न्या. शेख यांनी याबाबत दोघांवरही गुन्हा दाखल करण्याबाबत १५६ (३) चे आदेश दिले. मात्र जिल्हा न्यायालयात केलेल्या अपिलात काकडे कायम राहीले तर पोलिस अधिक्षक बी. जी. गायकर यांच्यावरील आदेश मागे घेण्यात आले होते. यानंतर काकडे यांनीही उच्च न्यायालयाच्या खंडपीठात फौजदारी अर्ज क्रमांक ६५५०/२०१४ नुसार अर्जाद्वारे ज्या मुद्यांवर बी. जी. गायकर यांना जिल्हा न्यायालयाने मुक्त केले त्या मुद्यांवर अपिल दाखल केले आहे. परंतु, त्याचा अद्याप निकाल लागायच्या आधी प्रथम वर्ग न्यायाधिश व जिल्हा न्यायाधिशांच्या आदेशाची तब्बल नऊ महिन्यानंतर तालिम करताना दि. २८ नोव्हेंबर रोजी एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सपोनि ए. डी. पोवार यांनी तत्कालीन सपोनि प्रदीप काकडे यांच्याविरुध्द पासपोर्ट अ‍ॅक्ट १९६७ नुसार गुन्हा दाखल झाला आहे. (प्रतिनिधी)
या प्रकरणातील आणखी एक महत्त्वपूर्ण आणि जमेची बाजू म्हणजे आपल्या मुलीला खोटा पत्ता प्रमाणित करुन दिल्याबद्दल चक्क वडील दिपक पाठक हेच न्यायालयात गेले होते. युवापिढीच्या चुकीच्या कृत्यांना पोलिसांनी पाठीशी घातल्याबद्दल आपण ही याचिका केल्याची तक्रार त्यांनी न्यायालयात दाखल केली होती.

Web Title: An FIR has been filed against Pradeep Kakade