शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

अखेर चौकशीसाठी समिती स्थापन

By admin | Updated: June 1, 2014 00:24 IST

हरी मोकाशे , लातूर कुटूंब नियोजनाच्या बिनटाक्याच्या शस्त्रक्रियेदरम्यान जंतूसंसर्गाने बळी गेलेल्या महिलेच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागाने पाच सदस्यीय समिती स्थापन केली आहे़

 हरी मोकाशे , लातूर कुटूंब नियोजनाच्या बिनटाक्याच्या शस्त्रक्रियेदरम्यान जंतूसंसर्गाने बळी गेलेल्या महिलेच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी अखेर शनिवारी जिल्हा आरोग्य विभागाने पाच सदस्यीय समिती स्थापन केली आहे़ एक आठवड्यापासून या प्रकरणाची चौकशी करण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्याने ‘लोकमत’मधून वृत्त प्रकाशित होताच ही दखल घेण्यात आली आहे़ उदगीर येथे सालगडी म्हणून मालू टाळीकुटे हे आपली पत्नी ललिताबाई टाळीकुटे व तीन मुलांसमवेत काम करीत होते़ ९ महिन्यांपूर्वी बाळंत झालेल्या ललिताबाई टाळीकुटे यांच्यावर कुटुंबनियोजनाची बिनटाक्याची शस्त्रक्रिया करण्यासाठी उदगीरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते़ मात्र या महिलेस शस्त्रक्रियेवेळी जंतुसंसर्ग झाल्याने तिचा उपचारावेळी मृत्यू झाला होता़ हे प्रकरण घडून आठवड्याचा कालावधी उलटला असतानाही जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांकडून कुठलीही दखल घेतली जात नव्हती़ त्यामुळे लोकमतमधून ३१ मे रोजी चौकशीत आरोग्य विभागच बेफिकिरच! या मथळ्याखाली सविस्तर वृत्त प्रकाशित करण्यात आले़ त्याची दखल याच दिवशी पाच सदस्यीय चौकशी समितीची स्थापना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ सुधाकर शेळके यांनी केली आहे़ कुटुंबकल्याण गुणवत्ता अभिवचऩ़़ कुटुंबकल्याण गुणवत्ता अभिवचन समिती असे या चौकशी समितीचे नाव आहे़ यात निलंगा उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक, चाकूर ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक, रेणापूरच्या ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक, सी़एस़ कार्यालयातील निवासी वैद्यकीय अधिकारी आणि जि़प़च्या आरोग्य विभागातील एक अधिकारी यांचा या समितीत समावेश आहे़ मयत महिलेच्या नातेवाईकास शासनाच्या वतीने तात्पुरती ५० हजार रुपयांची मदत करण्यात येणार आहे़ त्यासाठीचा प्रस्ताव शनिवारी तयार करण्यात आला आहे़ येत्या दोन दिवसांत ही मदत देऊ, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ सुधाकर शेळके यांनी सांगितले़ या महिलेच्या शवविच्छेदनाचा मुख्य वैद्यकीय अहवाल अद्यापही प्राप्त झाला नाही़ या अहवालासाठी औरंगाबाद, लातूरकडे चौकशी करण्यात येत आहे़ हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यानुसार कारवाई करण्यात येईल, असे उदगीर शहर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक आऱ के़ डुणगे यांनी सांगितले़