शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

हदगावच्या जुन्या तहसीलला भयंकर आग

By admin | Updated: March 20, 2016 01:02 IST

हदगाव : येथील निजामकालीन तहसील कार्यालयाला १८ मार्च रोजी आग लागून उपविभागीय कार्यालयाचे कालबाह्य रेकॉर्ड जळाले़ आगीवर नियंत्रण ठेवण्यास अर्ध्या तासातच यश आले़

हदगाव : येथील निजामकालीन तहसील कार्यालयाला १८ मार्च रोजी आग लागून उपविभागीय कार्यालयाचे कालबाह्य रेकॉर्ड जळाले़ आगीवर नियंत्रण ठेवण्यास अर्ध्या तासातच यश आले़ शुक्रवारी दुपारी खिडकीतून धूर निघत असल्याचे समोरील दुकानदाराने बघितले़ त्याने ही माहिती तहसील कार्यालयाला कळविली़ नायब तहसीलदार व्ही़ आऱ नरवाडे, नायब तहसीलदार राठोड, पेशकार संजय गोडबोले, तलाठी पुपाटे, कापसे, पालिका मुख्याधिकारी पेंटे, अभियंता वानखेडे, माजी नगसेवक सुनील सोनुले, पोलिस निरीक्षक दत्तात्रय वाघमारे, दत्तात्रय वाघमारे, प्रियंका वासनिक आदींनी घटनास्थळी भेट दिली़ अर्ध्या तासातच अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळविले़ शुक्रवारी आठवडी बाजार असल्याने बघ्यांची मोठी गर्दी झाली होती़ पोलिसांनी तहसीलचे गेट बंद करून कोणालाही मध्ये येवू दिले नाही़ याबद्दल तहसीलदार संदीप कुलकर्णी म्हणाले, नवीन जागी स्थलांतरित होऊन चार वर्षांचा कालावधी उलटला़ महत्त्वाची कागदपत्रे, अभिलेखे नवीन तहसीलमध्ये सुरक्षित आहेत़ जुन्या तहसीलमध्ये निकामी कागदपत्रे होती, असे त्यांनी सांगितले.(वार्ताहर)