शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: पश्चिम बंगालमध्ये भाजपा सरकार स्थापन करणार; ममता बॅनर्जींसोबत 'खेला होबे'
2
मोठी घडामोड! काँग्रेस केरळनंतर दुसऱ्या राज्यातही सत्तास्थापन करणार? थलापती विजयच्या वडिलांचे निमंत्रण
3
Success Story: एकेकाळी काँक्रिटच्या जमिनीवर झोपायचे लक्ष्मी मित्तल; आता ₹२७०००० कोटींची नेटवर्थ, IPL टीमचेही बनले मालक
4
बंगालमध्ये बाबरी मशीद बांधणारे हुमायूं कबीर २ जागांवर लढत होते, निकालात त्यांचे काय झाले?
5
Airplane Accident: लँडिंग करतानाच विमानाची ट्रकला धडक; न्यूयॉर्क विमानतळाजवळील घटनेचा व्हिडीओ बघा
6
Baramati Result 2026: सुनेत्रा पवारांना रेकॉर्डब्रेक मतदान; अजित पवारांचा विक्रम मोडत जादुई आकडा पार, एकतर्फी विजयाच्या दिशेने वाटचाल
7
ममता बॅनर्जी वि. सुवेंदू अधिकारी...! भवानीपूरमध्ये आतापर्यंत सात फेऱ्या झाल्या, प्रत्येक फेरीचा निकाल आला...
8
'तीन'वरून ७७ वर आणि आता थेट १९०+ आमदार! भाजपाचा थक्क करणारा 'सक्सेस रेट'; पश्चिम बंगालमध्ये कसं फुललं 'कमळ'
9
असह्य वेदना पण लेकाने शिकावं ही एकच इच्छा; माऊलीचा 'हा' Video पाहून पाणावतील डोळे
10
तृणमूल काँग्रेस पराभवाच्या उंबरठ्यावर, ममता बॅनर्जी हताश, पण सोडली नाही विजयाची आस, कार्यकर्त्यांना केलं असं आवाहन
11
पाकिस्तानने संधीचं सोनं केलं! इराणच्या मजबुरीचा फायदा घेत खोऱ्यानं पैसा ओढला; आता पडणार नोटांचा पाऊस!
12
Numerology: 'या' जन्मतारखेचे लोक असतात अति संवेदनशील; सभोवतालच्या वातावरणाचा खोलवर होतो परिणाम
13
थलापती विजयचे राज्यभरात ८५ हजार फॅन क्लब्स; TVK च्या विजयात निभावली सर्वात मोठी भूमिका
14
आसनसोलमध्ये तृणमूलच्या कार्यालयात तोडफोड, बॉम्ब सापडला; ममता बॅनर्जींच्या घराबाहेर 'जय श्री राम'च्या घोषणा
15
केरळमध्ये 'या' पक्षाने अवघ्या २७ जागा लढवल्या, त्यातील २३ जागांवर पुढे; २१ उमेदवार मुस्लीम
16
Thalapathy Vijay Net Worth: अभिनेता ते राजकारणी; ६०० कोटींपेक्षा अधिकचं साम्राज्य, कशी आहे थलापति विजय यांची लक्झरी लाईफ 
17
लग्नानंतर सासरची पायरी चढण्याआधीच मोडला संसार! २०० रुपयांच्या नोटेमुळे नवरदेवाचा असा झाला भांडाफोड
18
तीन राज्यं जिंकली, पण दोन राज्यांत भाजपाची निराशा; भोपळा फोडला, पण हवं तसं 'कमळ' फुलेना!
19
दाक्षिणात्य सुपरस्टार विजयला 'थलापती' का म्हणतात? जाणून घ्या ३२ वर्षे जुनी कहाणी!
20
IPL 2026: RCBला मोठा धक्का! तुफान घोडदौड सुरू असताना स्टार खेळाडू संघ सोडून घरी परतला
Daily Top 2Weekly Top 5

एफडीए आणि मनपा करणार पंचनामा !

By admin | Updated: May 7, 2014 00:05 IST

लातूर : कोणताही व्यवसाय करताना नोंदणी आवश्यक असते. नोंदणीशिवाय व्यवसाय करता येत नाही.

लातूर : कोणताही व्यवसाय करताना नोंदणी आवश्यक असते. नोंदणीशिवाय व्यवसाय करता येत नाही. नोंदणी झाली की कायद्याचे पालन करणे संबंधित व्यवसायिकांना बंधनकारकच आहे. पाणी विक्रीचा व्यवसाय करणारेही यास अपवाद नाहीत. त्यामुळे ग्राहकांना गुणांकनानुसार पाणी दिले जाते की नाही? याची तपासणी अन्न व औषधी प्रशासन तसेच महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या संयुक्त पथकाद्वारे होणार आहे. येत्या एक-दोन दिवसात दोन्ही विभागांच्या कर्मचार्‍यांची या विषयावर कायदेशीर चर्चा करून प्रत्यक्ष मोहिमेला प्रारंभ केला जाईल, असा दुजोरा मनपाच्या आरोग्य अधिकार्‍यांनी दिला आहे. दरम्यान जिल्हाधिकारी डॉ. विपीन शर्मा यांनीही एफडीएला संबंधितावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. ‘लोकमत, ने पानी का धंदा..तबियत को गंदा’ या मथळ्याखाली पॅकबंद पाण्याचा प्रश्न मंगळवारच्या अंकात ऐरणीवर घेतला होता. याची दखल घेत प्रशासनाने जार वॉटर तपासणीसाठी संयुक्त पथक स्थापन्यासंदर्भात विचार सुरू केला आहे. येत्या एक-दोन दिवसात अन्न व औषधी प्रशासनाचे अधिकारी तसेच महानगर पालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकार्‍यांची संयुक्त बैठक होऊन जारद्वारे पाण्याची विक्री करणार्‍या व्यवसायिंकाकडील पाणी नमुने तपासणीसाठी घेतली जातील. या पाण्याची गुणवत्ता पिण्यायोग्य आहे की नाही? शास्त्रोक्त पद्धतीने तपासण्या केल्या जातात का? संबंधित व्यवसायिक अथवा प्लांटधारकांकडे सुक्ष्म जीवशास्त्र आणि रसायनशास्त्राचा अभ्यास असणारे पदवीधर प्रयोगशाळेत आहेत की नाहीत? या प्रयोगशाळेत पाणी शुद्धिकरणाच्या चाचण्या घेतल्या जातात की नाहीत? हे पाहिले जाणार आहे. शिवाय, विक्री केले जात असलेले पाणी पिण्यायोग्य आहे की नाही? त्यात क्षार घटकांचे प्रमाण कसे आहे? या सर्व बाबींची तपासणी केली जाणार आहे. सध्या अन्न व औषधी प्रशासनाकडे भारतीय मानक ब्युरोचे मानांकन असलेल्या लातूर जिल्ह्यात पाचच पाणी विक्री व्यवसायिकांच्या नोंदी आहेत. अन्य व्यवसायिकांकडे कुठला परवाना आहे. तो अधिकृत आहे किंवा नाही? त्याला कोणत्या नियमानुसार परवाना देण्यात आला आहे? या सर्व बाबींची तपासणी या मोहिमेमुळे होईल. पाणी तपासा; जिल्हाधिकार्‍यांचे एफडीएला आदेश़़़ चाचणीविना पाणी विक्रीचा धंदा गंभीर आहे. शरिराला हानीकारक असणारे पाणी विकले जात असेल तर त्याची तपासणी झालीच पाहिजे. अन्न व औषधी प्रशासनाला हात झटकता येणार नाहीत. मानांकन असो वा नसो, पाणी गुणांकनानुसारच आहे की नाही? याची तपासणी करण्याची जबाबदारी अन्न व औषधी प्रशासनाची आहे. त्यामुळे या विभागाला संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. आधीच लातूर शहर व जिल्ह्यात पाणीटंचाई आहे. ग्राऊंड वॉटर व साठविलेले पाण्याचे शुद्धिकरण करून पाणीपुरवठा करून टंचाई दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. त्यात पाणीविक्रेते शास्त्रोक्त पद्धतीने शुद्धिकरण न करता पाण्याचा धंदा करत असतील तर हा गंभीर प्रकार आहे. त्यात कोणाचीही गय केली जाणार नाही. पैसे कमावण्याच्या नादात नागरिकांच्या आरोग्याशी कोण खेळ खेळत असेल तर कारवाई केली जाईल, तसे आदेश अन्न व औषधी प्रशासनाला मंगळवारी सकाळी ‘लोकमत’ वाचल्यानंतर तात्काळ दिले असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन शर्मा यांनी सांगितले. आरोग्याशी संबंधित ‘लोकमत’ने हा विषय हाताळून प्रबोधन केल्याचे कौतुकही जिल्हाधिकार्‍यांनी केले आहे़