शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनी पाडला कांद्याचा लिलाव बंद

By admin | Updated: July 15, 2016 01:08 IST

वैजापूर : कांद्याचा घसरलेला भाव व सहा टक्के अडतीमुळे गुरुवारी वैजापूर येथील कांदा मार्केटमध्ये शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडला.

वैजापूर : कांद्याचा घसरलेला भाव व सहा टक्के अडतीमुळे गुरुवारी वैजापूर येथील कांदा मार्केटमध्ये शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडला. तसेच खरीददारांकडून सहा टक्के अडत घेण्यात येत असल्याने हा कांदा कोणीच घेतला नाही. परिणामी, कांदा मार्केटमध्ये जवळपास एक हजार गोणी कांदा तसाच पडून राहिला.वैजापूर शहरालगतच्या घायगावनजीक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा मार्केटमध्ये जाहीर लिलाव पद्धतीने कांदा खरेदी केली जाते. गुरुवारी मार्केटमध्ये एक हजार कांदा गोणीची आवक होती. यापूर्वी कांदा विक्रीसाठी आणणाऱ्या शेतकऱ्यांकडून सहा टक्के अडत वसूल केली जात असे; परंतु शासनाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांऐवजी कांदा खरेदी करणाऱ्यांकडून सहा टक्के अडत वसूल करावी, असे धोरण जाहीर केले. मार्केटमध्ये लिलाव पद्धतीने जे अडत व्यापारी कांदा खरेदी करतात त्यांनी ही सहा टक्के अडत देण्यास नकार दिला. याशिवाय कांद्यासाठी कमी असलेला दर पाहून शेतकऱ्यांनीही कांदा देण्यास नकार देऊन लिलाव होऊ दिला नाही. सध्या कांद्याला सरासरी प्रति क्विंटल ९०० रुपये भाव आहे. खरीददार अडत देण्यास तयार नसल्याने अडत व्यापारीही कांद्याचा लिलाव करण्यास धजावले नाहीत. पर्यायाने गुरुवारी कांदा मार्केटमध्ये जवळपास एक हजार गोणी कांदा पडून होता.अगोदरच कांद्याला कमी असलेला भाव व त्यात कांदा खरीददारांकडून सहा टक्के अडत वसूल करण्याचे धोरण त्यामुळे खरीददार अडत द्यायला तयार नाहीत. त्यामुळे अडत व्यापाऱ्यांचे सॅण्डविच झाल्याचे अडत व्यापारी पवन ठोंबरे व विशाल गायकवाड यांनी सांगितले. अडतीच्या विषयावर मार्ग निघेपर्यंत मार्केटमध्ये कांदा खरेदी होते की नाही, याबाबत सध्यातरी साशंकता आहे.