शहरं
Join us  
Trending Stories
1
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
2
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
4
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
5
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
6
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
7
पंत, संजू सॅमसन बाहेर; नवख्या प्रिन्स यादव, गुरनूर ब्रारला संधी! BCCIचे ५ आश्चर्यकारक निर्णय
8
DCM एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; राजकीय घडामोडींना वेग, चर्चेला उधाण, नेमके घडतेय तरी काय?
9
भेदक गोलंदाजी, खालच्या फळीत जलद धावा करण्याची क्षमता; ६.५ फूट उंचीचा ऑलराउंडर टीम इंडियात!
10
"इंधन दर १७ रुपयांनी वाढले तरच...!", ब्रोकरेज फर्मनं मांडलं थक्क करणारं गणित; पेट्रोल-डिझेल आणखी भडकणार?
11
"रेवंत रेड्डी बनणार तेलंगणाचे 'शुभेंदु अधिकारी'!" भाजप खासदाराची भविष्यवाणी, केला मोठा दावा; काँग्रेसचं टेन्शन वाढणार 
12
मोहम्मद शमीचं आंतरराष्ट्रीय करिअर संपलं? "आम्ही त्याचा विचारच केला नाही..." आगरकर नेमकं काय म्हणाले?
13
मॅरिड बॉयफ्रेंडसाठी सेल्स गर्लने १.६६ कोटींच्या दागिन्यांवर डल्ला मारला, पण आंघोळीला गेली अन् घात झाला
14
Sanjay Raut: "लोक भाजपला मतदान करून आपल्या कर्माची फळं भोगतायत!" संजय राऊत असं का म्हणाले?
15
टीम इंडियाची घोषणा; गिलच्या कॅप्टन्सीत श्रेयस अय्यर वनडेत डेप्युटी! KL राहुल कसोटी संघाचा उपकर्णधार
16
उमर खालिदला दिलासा नाहीच, जामीन याचिका फेटाळली; दिल्ली कोर्टाने फटकारले, नेमके काय घडले?
17
"सायोनी घोष यांचं शीर...!"; भाजप नेत्याचं वादग्रस्त विधान, केली १ कोटींची घोषणा; पक्ष म्हणाला- त्यांचे वैयक्तिक विचार 
18
बारसू, पूर्णगड, सिंधुदुर्गात अणुऊर्जा प्रकल्प होणार; CM फडणवीसांच्या उपस्थितीत सामंजस्य करार
19
Payal Kapadia : नेत्रदीपक भरारी! पायल कपाडिया यांनी रचला इतिहास; कान्सच्या 'क्रिटिक्स वीक' ज्युरी अध्यक्षपदी निवड
20
“आर्थिक मंदीचं वादळ येतंय, खूप कठीण काळ, मोठा फटका बसेल”; राहुल गांधींनी व्यक्त केली भीती
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचा फायदा; ‘पिकेल तेथे विकेल’; अन्न सुरक्षा आयोगाकडून अभ्यास समितीची स्थापना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2023 10:17 IST

‘पिकेल तेथे विकेल’ या तत्त्वावर त्या-त्या भागातील शेतकऱ्यांचा उत्पादित शेतीमाल खरेदी करावा.

छत्रपती संभाजीनगर :  ‘पिकेल तेथे विकेल’ या तत्त्वावर त्या-त्या भागातील शेतकऱ्यांचा उत्पादित शेतीमाल खरेदी करावा. तसेच, पाच शासकीय योजनांमार्फत जे धान्य वाटप होते, त्या योजनांर्तगत लाभार्थींना वाटप करावे, या याचिकेची दखल घेत अन्नसुरक्षा आयोगाने  त्यासंदर्भात सखोल अभ्यास करण्यासाठी एक समिती स्थापन करण्याचे आदेश शुक्रवारी दिले. 

 यासंदर्भात भारतीय किसानसंघाने  अन्नसुरक्षा कायदा १६(६) (ग) नुसार अन्नसुरक्षा आयोगाकडे याचिका दाखल केली होती. आयोगाने केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांसाठी लागणारे अन्नधान्य खरेदी ही त्या-त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून खरेदी करावी, म्हणजे ‘पिकेल तेथे विकेल’ ही संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यात येईल, यासाठी अधिक अभ्यासासाठी शासकीय व अशासकीय सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली. आयोगाच्या निर्णयामुळे किसान संघाचे महाराष्ट्र अध्यक्ष बळीराम सोळके यांनी स्वागत केले. 

संघाच्या वतीने ॲड. अजय तल्हार व शिल्पा तल्हार यांनी युक्तिवाद केला. किसानसंघाचे महाराष्ट्र प्रदेश महामंत्री  किशोर देशपांडे यांनी ही याचिका दाखल केली होती. 

काय होतील फायदे?   

वाहतूक व साठवणूक यावर खर्च होणारा 
फार मोठा निधी वाचेल. 
यासाठी कोणत्याही नवीन निधीची आवश्यकता पडणार नाही. 
स्थानिक शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळेल. 
हमीभावाने शेतीमालाची खरेदी होईल. 
अत्यल्प भूधारक, अल्पभूधारक शेतकरी, शेतकरी गट, यांचे सक्षमीकरण होईल.  
लाभार्थींना चांगले व सकस अन्नधान्य मिळेल. 

अभ्यास समितीत कोणाचा समावेश?

आनंद खंडागळे (बालविकास प्रकल्प अधिकारी, तुर्भे पनवेल)
संजय बागुल (जिल्हा कार्यक्रम अधिकारी, ठाणे)
मदन देशपांडे (अशासकीय सदस्य)
महेश लोंढे (अशासकीय सदस्य)  
अनिल घनवट (अशासकीय सदस्य)
सचिन धांडे (अशासकीय सदस्य)

समितीला एका महिन्यात द्यावा लागेल अहवाल 

‘पिकेल तेथे विकेल’ या योजनेचा शेतकऱ्यांना किती लाभ होईल, प्रत्येक जिल्ह्यात ही संकल्पना लागू होऊ शकते का, इत्यादींचा अभ्यास या समितीला करावा लागणार आहे. संपूर्ण अहवाल सादर करण्यासाठी एक महिन्याची मुदत आयोगाने दिली आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर आयोग सरकारला सूचना करेल की, समितीने दिलेला अहवाल कशा प्रकारे आणला जाऊ शकतो, त्याची पुढील कार्यवाही सरकारने करावी.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद