शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचे लक्ष लागले आभाळाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 18:12 IST

खामखेडा : यंदा पावसाळा उशीरा सुरु होणार असल्याने शेतकरी चिंतातुर झाला आाहे. शेतीच्या कामाकरीता त्याचे लक्ष आता आभाळाकडे लागले आहे. हवामान खात्याने चालु वर्षी लवकर पाऊस येईल असा अंदाज व्यक्त केला होता. परंतु पावसाळा हा रोहिणी नक्षत्रापासून सुरवात होते. २४ मे पासून रोहिणी नक्षत्राला सुरवात झाली आहे. परंतु रोहिणी नक्षत्रात लागून तीन दिवस होत आले परंतु पावसाचे कोणतेही संकेत दिसत नाही.

ठळक मुद्देखामखेडा : यंदा पावसाळा उशीरा सुरु होणार असल्याने चिंता

खामखेडा : यंदा पावसाळा उशीरा सुरु होणार असल्याने शेतकरी चिंतातुर झाला आाहे. शेतीच्या कामाकरीता त्याचे लक्ष आता आभाळाकडे लागले आहे.हवामान खात्याने चालु वर्षी लवकर पाऊस येईल असा अंदाज व्यक्त केला होता. परंतु पावसाळा हा रोहिणी नक्षत्रापासून सुरवात होते. २४ मे पासून रोहिणी नक्षत्राला सुरवात झाली आहे. परंतु रोहिणी नक्षत्रात लागून तीन दिवस होत आले परंतु पावसाचे कोणतेही संकेत दिसत नाही.दर वर्षी १५ मे नंतर पावसाचे वातावरण तयार होत असे. परंतु या वर्षी मे महिना संपत आला तरी पावसाचे कोणतेही चिन्हे दिसत नाही. दिवसभर भरपूर उष्णता होते. परंतु जोरदार वारा वाहत नाही. आकाशात ढग ही जमा होत नाही. त्यामुळे शेतकर्यांचे लक्ष आकाशात लागु आहे. जर जातात. शेतकरी खरीपाच्या मशागतीच्या कामे पूर्ण करीत आहे. यामुळे खरीपाच्या पेरणी आदि पूर्वमशागत म्हणजे जमिनीला बेले मारणे, वखारणी करणे, शेणखात मिळविणे आदि कामे केल्यास पिकांची पेरणी सुरळीत करता येते. परंतु रोहिणीच्या नक्षत्राने पाठ दाखिवली मृगाचा पावसात भुईमूगाच्या व इतर पिकाच्या दृष्टीने उत्तम असतो.जर मृग नक्षत्रात पावसाला सुरवात झाली तर बाजरी, भुईमुग, तुर, मका आदि पिकांची पेरणी करतात. मका या पिकाकडे नगदी पिक म्हणून पाहिले जाते. खामखेडा परिसरामघ्ये मकाच्या पेरणी मोठया प्रमाणात केली जाते. जर मृग नक्षत्रात सुरवातील पाऊस पाडला नाही या पिकांची पेरणीस उशीर होणार आहे. तेव्हा भुईमूग, बाजरी, तुर, मुग, मका आदि पिकाऐवजी , सोयाबीनसह अन्य पिकांची पेरणी करावी लागणार आहे. अजूनही पावसाची कोणतीही चिन्हे दिसत नसल्याने जास्त कालावधिच्या मका क्षेत्रात घट होणार असल्याचा अंदाज शेतकरी व्यक्त करीत आहेत.लांबलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आता चिंतेचे वातावरण असून, मागील दोन वर्षापासून दुष्काळाला सामोरे गेल्याने याही वर्षी तीच परिस्थिती उद्भवेल का? याची धास्ती शेतकºयांनी घेतली आहे. गेल्या वर्षीही रोहिणी, मृग नक्षत्रात पावसाने ओढ दिली होती, त्यामुळे पेरणी उशीरा झाल्याने उत्पादनात मोठी घट झाली होती.गेल्या दोन वर्षापासूनब उशिरा येणाºया पावसामुळे पिकांची नियोजन बदल करावा लागत असल्याने पाहिजे. त्या प्रमाणात पिकाचे उत्पादन येत नाही. त्यामुळे उत्पादनात घट झाल्याने हाती उत्पन्न नआल्यामुळे शेतकºयांचे आर्थिक नियोजन ढासळत आहे.