शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

एक्स्प्रेसवेबाबत संवाद बैठक

By admin | Updated: August 28, 2016 00:17 IST

बदनापूर : तालुक्यातून जात असलेल्या मुंबई-नागपूर एक्स्प्रेस वेबाबत शासनाच्या धोरणाची जिल्हाधिकाऱ्यांनी एका बैठकीतून शेतकऱ्यांना माहिती देऊन त्यांचे प्रश्न जाणून घेतले.

बदनापूर : तालुक्यातून जात असलेल्या मुंबई-नागपूर एक्स्प्रेस वेबाबत शासनाच्या धोरणाची जिल्हाधिकाऱ्यांनी एका बैठकीतून शेतकऱ्यांना माहिती देऊन त्यांचे प्रश्न जाणून घेतले. बदनापूर येथे शनिवारी पं.स. सभागृहात जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांच्या अध्यक्षतेखाली शेतकरी व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यामधे जिल्हाधिकारी जोंधळे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना पॉवर प्रझेंटेशनच्या माध्यमातून मुंबई-नागपूर एक्स्प्रेस वे बाबतची माहिती दिली. या प्रकल्पाची निर्मिती,या प्रकल्पामुळे या भागाचा होणारा विकास या प्रकल्पाबाबतची शासनाची भूमिका व धोरण जमीन संपादन प्रक्रिया शेतरक्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधा, मावेजा आदी मुद्यांची माहिती दिली. शेतकऱ्यांच्या मागण्यांची नोंद घेऊन याबाबत शासनाला कळविण्याचे आश्वासन दिले. यावेळी कृति समितीचे भाऊसाहेब घुगे, बाळासाहेब वाकुळणीकर, प्रशांत वाढेकर, प्र्रशांत गाढे आदींनी शेतकऱ्यांना पाचपट मावेजा एकरकमी द्या, विकासातील ३० टक्के जागा द्या अशा विविध मागण्यांचे निवेदन दिले. पद्माकर पडूळ, राजू गुसिंगे, उदय काकडे, शिवाजी दराडे, उध्दव गिते, काकासाहेब नाईकवाडे, कान्हेरे आदींनी या प्रकल्पाबाबत विविध प्रश्न विचारले. प्रकल्पासाठी खुणा करताना कोणतीही पूर्वसूचना दिली नाही याबद्दल नाराजी व्यक्त केली.