स्वच्छता निविदेला प्रतिसादाची अपेक्षा

By Admin | Updated: July 13, 2017 00:27 IST2017-07-13T00:25:31+5:302017-07-13T00:27:27+5:30

नांदेड: शहर स्वच्छतेसाठी पहिल्या निविदांना प्रतिसाद न मिळाल्याने आता दुसऱ्यांदा ई-निविदा मागविण्यात आल्या असून या निविदांना कितपत प्रतिसाद मिळतो

Expectation of cleanliness tuition | स्वच्छता निविदेला प्रतिसादाची अपेक्षा

स्वच्छता निविदेला प्रतिसादाची अपेक्षा

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड: शहर स्वच्छतेसाठी पहिल्या निविदांना प्रतिसाद न मिळाल्याने आता दुसऱ्यांदा ई-निविदा मागविण्यात आल्या असून या निविदांना कितपत प्रतिसाद मिळतो हे लवकरच स्पष्ट होणार आहे़ २८ जुलैपर्यंत शहर स्वच्छतेसाठी ई-निविदा स्वीकारल्या जाणार आहेत़
शहर स्वच्छतेचे काम करणाऱ्या ए टू झेड या कंत्राटदाराने ३१ मार्च रोजी कामबंद केल्यानंतर शहरात स्वच्छतेचा मोठा प्रश्न उद्भवला होता़ अनेक भागात साचलेल्या कचऱ्यांच्या ढिगाऱ्यामुळे आरोग्याचा प्रश्नही उद्भवला होता़ एकवेळा नाही दोनवेळा नाही तर तब्बल ५ वेळा मुदतवाढ दिल्यानंतर दोन निविदा प्राप्त झाल्या़ या निविदाधारकांशी प्रशासनाने चर्चा केली़ मात्र ही चर्चा निष्फळ ठरली़ दर आणि कंत्राटदाराची पात्रता यांचा मेळ लागलाच नव्हता़ त्यामुळेच नव्याने निविदा मागविल्याची माहिती स्वच्छता विभागाचे सहायक आयुक्त सादिक यांनी दिली़ दरम्यान, शहरात जवळपास ८५० मजुरांच्या सहायाने स्वच्छता केली जाते़ महापालिकेने २५ सायकल रिक्षा नव्याने खरेदी केल्या असून आणखी आॅटो भाड्याने घेतले जाणार आहेत़ त्यामुळे स्वच्छतेचा प्रश्न निकाली निघेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला़

Web Title: Expectation of cleanliness tuition