शेती उत्पादन कंपनी स्थापन करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:12 IST2021-02-05T04:12:40+5:302021-02-05T04:12:40+5:30
औरंगाबाद : शेतीमध्ये तंत्रज्ञान वापरण्यासाठी तुकड्या तुकड्यातील विखुरलेल्या शेतीत अडचणी येतात. तंत्रयुक्त शेतीसाठी शेतकऱ्यांनी समूहात तंत्र वापरासाठी एकत्र येवून ...

शेती उत्पादन कंपनी स्थापन करा
औरंगाबाद : शेतीमध्ये तंत्रज्ञान वापरण्यासाठी तुकड्या तुकड्यातील विखुरलेल्या शेतीत अडचणी येतात. तंत्रयुक्त शेतीसाठी शेतकऱ्यांनी समूहात तंत्र वापरासाठी एकत्र येवून शेती उत्पादन कंपनीची स्थापना करावी, असा सल्ला विभागीय सहसंचालक डाॅ. दिनकर जाधव यांनी दिला आहे.
औरंगाबाद तालुक्यातील टोनगाव येथील शेडनेटला दिलेल्या भेटीप्रसंगी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. कृषी योजनेतून टोनगाव येथील लक्ष्मण आहेर, बबन कनाके यांनी उभारलेल्या शेडनेटमधील पिकांची पाहणी डॉ. जाधव, राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाचे सहयोगी संचालक डॉ. एस. बी. पवार, कृषी सहायक रामेश्वर ठोंबरे, ज्ञानदेव कारंडे आदींनी केली. यावेळी डॉ. पवार म्हणाले, शेतकऱ्यांनी तंत्रज्ञानाचा डोळसपणे वापर केला पाहिजे. पिकास पाण्याची गरज किती आहे, तेवढेच पाणी दिले जावे. पिकाला १०० पाणी टक्के देऊ नका ते ९५ टक्के इतके दिले तर पिकाचे मूळ खोलवर जातील. पिकाच्या उत्पादनासाठी मुळाचे कार्य महत्त्वाचे असते.