शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात

By Admin | Updated: June 7, 2017 00:14 IST2017-06-07T00:09:04+5:302017-06-07T00:14:40+5:30

नांदेड : विविध संघटनांच्या वतीने मंगळवारी नांदेडात छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला़

With the enthusiasm of Shivrajyabhishek ceremony | शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात

शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेडसह विविध संघटनांच्या वतीने मंगळवारी नांदेडात छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला़ सकाळपासून शिवभक्तांनी छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्यासाठी गर्दी केली होती़
सोहळ्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपशिक्षणाधिकारी शिवाजीराव खुडे, मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष डॉ़ प्रा़ गणेश शिंदे, प्रा़ संतोष देवराये, जिल्हाध्यक्ष डॉ़ सोपानराव क्षीरसागर, एऩ जी़ कल्याणकर, उद्धव पाटील सूर्यवंशी, प्रल्हादराव दुरपडे, पी़ के़ कदम, रमेश पवार, शिवाजी पाटील बामणीकर, सरस्वतीताई धोपटे, डॉ़ रेखाताई पाटील, जयश्रीताई भायेगांवकर, वनिताताई देवसरकर, ज्योतीताई पाटील, संतोष जाधव उमरदरीकर, रवी ढगे यांची उपस्थिती होती़
वर्ल्ड मराठा आॅर्गनायझेशन आणि सकल मराठा समाजाच्या वतीने शिवराज्यभिषेक सोहळ्यानिमित्त श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली़ १० वाजता शिवरक्तदानाला सुरुवात करण्यात आली़ यावेळी संघटनेचे संतोष शिंदे माळकौठेकर, जगदीश जाधव, शिवाजी किरकण पाटील, अविनाश हेंबाडे पाटील, गोविंद दुगावे पाटील, मनिष जाधव, अ‍ॅड़ कपिल गाडेगावकर, प्रदीप बागलगावे, शिवानंद लुटे, उमेश कदम, आनंद शिंदे, बालाजी कोठारे, व्यंकटेश चव्हाण, माणिक चव्हाण, गोविंद बोकारे, योगेश भुलंगे, रवी कदम, अमोल नलावडे, बळवंत पाटील यांची उपस्थिती होती़ तर भास्कर डोईबळे व राहुल औसेकर यांच्या हस्ते सकाळी सात वाजता शिवरायांच्या पुतळ्यास अभिषेक करण्यात आला़ यावेळी कृष्णा महाराज बेरळीकर, प्रवीण साले, अरुंधती पुरंदरे, विजय गंभीरे, घोरबांड, अभिमन्यू झाडे, दीपक औसेकर, गोविंद अंबुरे, कृष्ण इंगळे, विनायक तुप्तेवार, शिवप्रसाद चिटकुलवार, विक्रांत देशपांडे, वेदांत खेडकर उपस्थित होते़

Web Title: With the enthusiasm of Shivrajyabhishek ceremony