जि़ प़ कर्मचाऱ्यांच्या बदल्या ५ मेपासून

By Admin | Updated: April 23, 2016 23:57 IST2016-04-23T23:47:42+5:302016-04-23T23:57:06+5:30

नांदेड : जिल्हा परिषदेच्या गट क व ड कर्मचाऱ्यांच्या जिल्हातंर्गत बदल्यांचा मोसम ५ मेपासून सुरू होणार आहे़

Employees transfer from May 5 | जि़ प़ कर्मचाऱ्यांच्या बदल्या ५ मेपासून

जि़ प़ कर्मचाऱ्यांच्या बदल्या ५ मेपासून

नांदेड : जिल्हा परिषदेच्या गट क व ड कर्मचाऱ्यांच्या जिल्हातंर्गत बदल्यांचा मोसम ५ मेपासून सुरू होणार आहे़ त्यामुळे यावर्षी बदल्यांची प्रक्रिया होणार की नाही,या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे़
जिल्हा परिषद अंतर्गत तृतीय व चतुर्थश्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे वेळापत्रक जाहीर करणारा शासन आदेश जिल्हा परिषदेला प्राप्त झाला आहे़ त्यानुसार ५ ते १५ मे या कालावधीत जिल्हास्तरीय तर १६ ते २५ मे दरम्यान तालुकास्तरीय बदल्यांचा हंगाम सुरू होणार आहे़ विभागनिहाय सेवाज्येष्ठता यादी तयार करण्याचे काम सुरू झाले आहे़ दरम्यान, बदल्यांची प्रक्रिया समुपदेशनाद्वारे पार पडत असल्यामुळे जि़प़ पदाधिकाऱ्यांचा हस्तक्षेप कमी झाला आहे़
यापुढे सर्व जिल्हा परिषदेत शासन निर्णयाप्रमाणे जिल्हातंर्गत बदल्यांची कार्यवाही दरवर्षी करण्यात येणार आहे़ त्यामुळे बदल्याचे दरवर्षी निघणारे स्वतंत्र आदेश यापुढे निघणार नाहीत, असे शासनाने आदेशात म्हटले आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Employees transfer from May 5