शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
5
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
6
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
7
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
8
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
9
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
10
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
11
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
12
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
13
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
14
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
15
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
16
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
17
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
18
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
19
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
20
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्याची निर्यात वाढविण्याचे प्रयत्न

By admin | Updated: July 14, 2015 00:25 IST

औरंगाबाद : मराठवाड्यातून होणारी निर्यात वाढविण्याच्या प्रयत्नाचा भाग म्हणून इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ फॉरेन ट्रेडच्या (आयआयएफटी) शिष्टमंडळाने मराठवाड्यातील

औरंगाबाद : मराठवाड्यातून होणारी निर्यात वाढविण्याच्या प्रयत्नाचा भाग म्हणून इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ फॉरेन ट्रेडच्या (आयआयएफटी) शिष्टमंडळाने मराठवाड्यातील उद्योजकांच्या अडचणी समजावून घेतल्या. चेंबर आॅफ मराठवाडा अ‍ॅग्रिकल्चर अँड इंडस्ट्रीजच्या (सीएमआयए) सभागृहात यानिमित्त झालेल्या चर्चासत्रात उद्योजकांनी विविध मागण्या केल्या. देशाचे नवीन परकीय व्यापार धोरण केंद्र सरकार आखत आहे. या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातून होणारी निर्यात कशी वाढेल, याचे सर्वेक्षण करण्याचे काम ‘आयआयएफटी’ करीत आहे. ‘आयआयएफटी’चे सदस्य जयदीप मुखर्जी यांनी मराठवाड्यातील लघु, मध्यम आणि मोठ्या उद्योगाच्या प्रतिनिधींची भेट घेऊन चर्चा केली. ‘सीएमआयए’चे अध्यक्ष आशिष गर्दे, सुनील रायठठ्ठा, विजय लेकुरवाळे, उद्योग खात्याचे सहसंचालक प्रदीप देशमुख आदी यावेळी उपस्थित होते. निर्यातवाढीला चालना देण्यासाठी परकीय चलनविनिमय करणाऱ्या बँका, वित्तीय संस्थांची गरज असते. जालन्यात निर्यातवाढीची मोठी संधी असताना अशी सुविधा उपलब्ध नसल्याची खंत तेथील उद्योजकांनी बोलून दाखविली. औरंगाबादहून जवाहरलाल नेहरूपोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी)पर्यंत कंटेनर न्यावयाचा झाल्यास त्यात मोठा विलंब होतो, त्याचा निर्यातीवर प्रतिकूल परिणाम होत असल्याची भावना उद्योजकांनी व्यक्त केली. मुंबई येथील कस्टम क्लीअरन्सचे काम एका शिफ्टमध्येच चालते. ते चोवीस तास सुरूराहावे, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली. ‘डीएमआयसी’मुळे मोठी संधी दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर प्रकल्प (डीएमआयसी) आणि जालना येथील नियोजित ड्रायपोर्टच्या माध्यमातून मराठवाड्यातील उद्योगांना निर्यातीच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत. त्याचा लघु, मध्यम आणि मोठ्या उद्योगांनी फायदा करून घ्यावा, असे आवाहन उद्योग सहसंचालक पी. पी. देशमुख यांनी केले. नव्या निर्यात धोरणांमुळे उद्योगांना भेडसावणाऱ्या समस्या नक्कीच दूर होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. राज्यात ११ बैठका केंद्र व राज्य सरकारने उद्योगवाढीसाठी मेक-इन-इंडिया, मेक-इन-महाराष्ट्र, स्किल इंडिया आदी उपक्रम हाती घेतले आहेत. केंद्र आता नवीन परराष्ट्र निर्यात धोरणाची आखणी करीत आहेत. या पार्श्वभूमीवर ‘आयआयटीएफ’कडून सर्वेक्षण केले जाणार आहे. या संस्थेचे प्रतिनिधी राज्यात ११ ठिकाणी बैठका घेणार आहेत, असे सूत्रांनी सांगितले.