शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

कंत्राटदारांनी लावलेली झाडे जगली नसतील तर बिले देऊ नका: शिवेंद्रसिंहराजे भोसले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 19:26 IST

कंत्राटदारांची खैर नाही! वृक्ष लागवडीत हलगर्जीपणा केल्यास बिलं विसरा; शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले.

छत्रपती संभाजीनगर : वृक्षलागवड करणे, हा सार्वजनिक बांधकाम विभागाचा विशेष कार्यक्रम आहे. जर रस्ते व इतर सुविधांची कामे करताना कंत्राटदारांनी लावलेली झाडे जगली नसतील तर त्यांची देयके (बिले) अदा करू नका, असे आदेश बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भाेसले यांनी दिले. व्हीव्हीआयपी सुभेदारी गेस्ट हाऊसमध्ये मंत्री भाेसले यांनी विभागाची आढावा बैठक घेतली. मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांनी बैठकीत विभागाची माहिती सादर केली.

केंद्रीय मार्ग निधी, नाबार्ड ५०५४ (०३), राज्यमार्ग ५०५४ (०४), जिल्हामार्ग व इतर मार्गांसह रस्त्यालगत वृक्षारोपण कार्यक्रमाचा भोसले यांनी आढावा घेतला. तसेच इमारतींच्या कामांची तरतूदनिहाय माहिती घेतली. हायब्रीड ॲन्युटीअंतर्गत कामांवर क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे. रस्त्यांची देखभाल-दुरुस्ती करण्यात हलगर्जीपणा करणाऱ्यांवर निविदेतील अटींप्रमाणे कारवाई करावी. कामाच्या गुणवत्तेत तडजोड करू नका, असे आवाहनही भोसले यांनी क्षेत्रीय अधिकाऱ्यांना केले.

या कामांविषयी व्यक्त केले समाधानवेरूळ घृष्णेश्वर मंदिर परिसरातील विटा व चुन्यामध्ये कमान पोकळी व घुमट रचना पद्धतीचे काम, विधी विद्यापीठातील मुलांची मेस, २०० खाटांचे महिला रुग्णालय, बीडमधील २०० खाटांचे रुग्णालय, एसआरटी अंबाजोगाई येथील बाह्यरुग्ण विभाग इमारतीच्या कामांवर मंत्र्यांनी समाधान व्यक्त केले. छत्रपती संभाजीनगर मराठवाड्याचे मुख्यालय असून, येथे येणाऱ्या व्हीव्हीआयपींची संख्या अधिक आहे. त्यामुळे जुन्या विश्रामगृहाच्या दुरुस्तीची कामे लवकर हाती घेण्याच्या सूचना भोसले यांनी केल्या. अधीक्षक अभियंता सुंदरदास भगत यांनी आभार मानले. कार्यकारी अभियंता शेषराव चव्हाण यांच्यासह सर्व विभागांचे अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता बैठकीस उपस्थित होते.

बजेटमध्ये १५०० कोटींची तरतूद ....जिल्ह्यासाठी बजेटमध्ये १५०० कोटींची तरतूद असून, यातून ११०० कोटी रुपयांची बिले टप्प्याटप्प्याने अदा केली जातील, तर ४०० कोटी विकासकामांना उपलब्ध होतील, असे मंत्री भोसले यांनी बैठकीत सांगितल्याचे मुख्य अभियंता चव्हाण यांनी सांगितले. यापुढे नियमित निधी उपलब्ध होईल, असेही मंत्र्यांनी बैठकीत आश्वासित केल्याचे चव्हाण म्हणाले.

English
हिंदी सारांश
Web Title : Pay contractors only if planted trees survive: Shivendrasinharaje Bhosle

Web Summary : Minister Bhosle instructed officials to withhold payments to contractors if planted trees don't survive during road and infrastructure projects. He reviewed various projects, emphasizing quality and timely maintenance. He also expressed satisfaction with ongoing construction and renovation works.
टॅग्स :Shivendrasinghraja Bhosaleशिवेंद्रसिंहराजे भोसलेhighwayमहामार्ग