शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात नवीन ६४ विंधन विहिरी

By admin | Updated: May 27, 2014 00:56 IST

बीड : जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढत असल्याने पाणीटंचाई उग्र रुप धारण करु लागली आहे़ जिल्हा परिषदेने उपाययोजनार्थ १ कोटी ८५ लाख रुपयांचा कृती आराखडा तयार केला होता़

बीड : जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढत असल्याने पाणीटंचाई उग्र रुप धारण करु लागली आहे़ जिल्हा परिषदेने उपाययोजनार्थ १ कोटी ८५ लाख रुपयांचा कृती आराखडा तयार केला होता़ त्यानुसार आतापर्यंत नवीन ६४ विंधन विहिरींचे काम पूर्ण झाले असून आतापर्यंत २८ लाख ८० हजार रुपयांचा खर्च आला आहे़ जिल्ह्यात ८ हजार १४३ इतक्या विंधन विहिरी होत्या़ नव्याने ६४ विंधन विहिरी होत असल्याने हा आकडा ८ हजार २०७ वर पोहोचला आहे़ एका विंधन विहिरीसाठी ४५ हजार रुपये इतका खर्च करण्यात आला आहे़ मे महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात २८ विंधन विहिरींची कामे पूर्ण करण्यात आली़ त्यानंतर दोन टप्प्यांत अनुक्रमे १९ व १७ अशा एकूण ३६ विंधन विहिरींना मंजुरी देण्यात आली आहे़ जिल्हा परिषदेच्या वतीने उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर १ कोटी ८५ लाख रुपयांचा कृती आराखडा तयार केला होता़ भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे उपअभियंता बी़ डी़ पाटील यांनी तांत्रिक मान्यता देऊन हा प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांकडे मंजुरीसाठी पाठवला होता़ जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी या कृती आराखड्याला मंजुरी दिली़ पहिल्या टप्प्यात आष्टी, पाटोदा व शिरुर तालुक्यात २८ विंधन विहिरी घेण्यात आल्या़ दरम्यान, दुसर्‍या टप्प्यात मंजुरी मिळालेल्या ३६ विंधन विहिरींचे काम आठ दिवसांत पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राम यांनी दिले आहेत़ ई-टेंडरिंगची प्रक्रिया पूर्ण विंधन विहिरी घेण्यासाठी भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेकडे एकच बोअरवेल्स गाडी उपलब्ध आहे़ त्यामुळे खासगी बोअरवेल्सकडून ई- टेंडरींगद्वारे प्रस्ताव मागविले होते़ चारपैकी तीन बोअरवेल्सना हे काम मिळाले गेवराई, बीड व पाटोद्याच्या बोअरवेल्सला हे काम मिळाले आहे़ दुरुस्ती कामांवर भर उन्हाळ्याला सुरुवात होण्यापूर्वीच बंद असलेले हातपंप सुरु करण्याच्या दृष्टीने उपाययोजनांना सुरुवात करण्यात आली होती़ दुरुस्तीअभावी कुठलाही हातपंप बंद राहू नये याची पुरेपूर दक्षता घेतली जात आहे, असे भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे उपअभियंता पाटील यांनी सांगितले़ (प्रतिनिधी) दुसर्‍या टप्प्यात १६ लाख २० हजार रुपये खर्च करुन ३६ विंधन विहिरी घेण्यात येतील़ गेवराई तालुक्यातील ७ गावे, ४ वस्त्यांवर १२ तर आष्टी तालुक्यातील ७ गावे, ११ वस्त्यांवर १९ विंधन विहिरी होतील़ वडवणी तालुक्यातील २ गावे व ८ वाड्यांवर १० तर पाटोद्यात ४ गावे व १२ वाड्यांवर ७ विंधन विहिरी घेण्यात येतील, अशी माहिती भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे उपअभियंता बी़ डी़ पाटील यांनी दिली़