शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
5
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
6
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
7
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
8
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
9
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
10
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
11
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
12
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
13
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
14
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
15
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
16
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
17
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
18
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
19
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
20
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

आंतरराष्ट्रीय योग दिनासाठी जिल्हा सज्ज

By admin | Updated: June 21, 2015 00:27 IST

उस्मानाबाद : २१ जून रोजी साजऱ्या होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात जोरदार तयारी करण्यात येत असून,

उस्मानाबाद : २१ जून रोजी साजऱ्या होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात जोरदार तयारी करण्यात येत असून, विविध शाळा, महाविद्यालयात विद्यार्थ्यांना तज्ज्ञांमार्फत याचे प्रशिक्षणही दिले जात आहे. दरम्यान, या दिनाच्या जनजागृतीसाठी शनिवारी शहरातील प्रमुख मार्गावरून दिंडीही काढण्यात आली. रविवारी सकाळी ६ ते ८ या वेळेत येथील पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर योग दिनाचा मुख्य समारंभ होणार आहे. यासाठी पतंजली योग समिती, नेहरू युवा केंद्र, जिल्हा क्रीडाधिकारी, सर्वशिक्षा अभियान, आर्ट आॅफ लिव्हींग, ब्रह्मकुमारीज, रोटरी क्लब यांच्यासह शासकीय कार्यालये, स्वयंसेवी संस्था, विविध संघटनांनीही पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांतूनही याची जोरदार तयारी करण्यात येत आहे. यानिमित्त शनिवारी शहरात जनजागृती दिंडी काढण्यात आली. भानुनगरमधून निघालेली ही दिंडी सेंट्रल बिल्डींग, जिल्हाधिकारी कार्यालय, शिवाजी पुतळा, देडपांडे स्टँड, नेहरू चौक, माऊली चौक, काळा मारूती मंदिर, पोस्ट आॅफिस, अंबाला हॉटेल, लेडीज क्लब, जिजाऊ चौक, समता नगर,अ ानंद नगर, राम नगर मार्गे भानुनगरात पोहोंचली. दिंडीमध्ये योग दिनाबाबत माहिती सांगितली जात होती. तर टमटमवर या दिवसाचे महत्त्व सांगणारे बॅनर लावण्यात आले होते. ‘भारत माता की जय, योग दिन भारतीय संस्कृतीचा गौरव’ अशा घोषणाही देण्यात येत होत्या. येथील रा. प. महाविद्यालयात यानिमित्त १५ जूनपासून सकाळी ६ ते साडेसात या वेळेत योगाचे प्रशिक्षण दिले जात आहे. यात योग शिक्षक प्रा. डॉ. व्ही. बी. काशीद हे मार्गदर्शन करीत आहेत. सीटी प्राईड इंग्लिश स्कूलमध्येही शनिवारी शासकीय रुग्णालयातील आयुष विभागाचे डॉ. उजमा सय्यद आणि डॉ. नौशीन खान यांनी विद्यार्थ्यांना एलसीडी प्रोजेक्टरच्या मदतीने योगाचे प्रात्यक्षिक दाखविले. यावेळी प्राथमिक, पूर्व प्राथमिक, माध्यमिक, तसेच जीवन ज्योती नर्सिंग महाविद्यालयातील विद्यार्थिनीही उपस्थित होत्या. तसेच लिटल स्टार शाळेतही पतंजली योग समितीच्या वतीने विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी योगशिक्षिका साधना तावडे, कल्पना बोरा, वैशाली उपासे यांनी प्रशिक्षण दिले. उस्मानाबाद तालुक्यातील उपळे (मा) येथील भाई उध्दवराव पाटील प्रशालेत जवळपास चारशे विद्यार्थ्यांना कटके, अमोल घोगरे यांनी योगाचे प्रशिक्षण दिले. यावेळी मुख्याध्यापक डी. एम. कुलकर्णी यांच्यासह शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते. येथील नेहरू युवा केंद्राच्या वतीने व कल्याणसागर समूहाच्या सहकार्याने परंडा येथील कल्याणसागर माध्यमिक शाळेच्या मैदानावर हा दिवस साजरा करण्यात येणार आहे. परंडा शहर व तालुक्यातील नागरिकांसाठी हे शिबीर खुले राहणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली. (प्रतिनिधी)