सर्जरीत जिल्हा रुग्णालय राज्यात अव्वल

By Admin | Updated: December 8, 2015 00:06 IST2015-12-07T23:40:55+5:302015-12-08T00:06:38+5:30

बीड : येथील जिल्हा रूग्णालयाने राज्यात सर्वात जास्त सर्जरी, डिलेव्हरी केल्या आहेत. यामुळे राज्य आरोग्य विभागाकडून बीड जिल्हा रूग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक व कर्मचाऱ्यांचे कौतुक होत आहे.

District Hospital in Surgery tops in state | सर्जरीत जिल्हा रुग्णालय राज्यात अव्वल

सर्जरीत जिल्हा रुग्णालय राज्यात अव्वल


बीड : येथील जिल्हा रूग्णालयाने राज्यात सर्वात जास्त सर्जरी, डिलेव्हरी केल्या आहेत. यामुळे राज्य आरोग्य विभागाकडून बीड जिल्हा रूग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक व कर्मचाऱ्यांचे कौतुक होत आहे.
आरोग्य सुविधा चांगल्या मिळत नसल्याची मोठी ओरड जिल्हा रूग्णालयात सुरू असते. परंतु सोमवारी राज्य आरोग्य विभाग व जिल्हा शल्य चिकित्सक यांच्यात झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्स मध्ये बीड जिल्हा रूग्णालयाची राज्यात चांगली प्रगती असल्याचे अहवालावरून समोर आले.
एप्रिल २०१५ ते ३० नोव्हेंबर २०१५ या आठ महिन्यांमध्ये शस्त्रक्रियामध्ये बीड जिल्हा रूग्णालयाने आघाडी घेतली असल्याचे पहावयास मिळत आहे.
मागील आठ महिन्यांमध्ये बीड जिल्हा रूग्णालयात एकूण १२ हजार ६६४ शस्त्रक्रीया केल्या आहेत. यामध्ये छोट्या शस्त्रक्रीया ७ हजार ११३ तर पोटाच्या, हाडाच्या मोठ्या ५ हजार ५५१ शस्त्रक्रियांचा अहवालात समावेश आहे. जिल्हा रूग्णालयाने केलेल्या कामगिरीबाबत वरिष्ठांकडून कौतूक होत असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: District Hospital in Surgery tops in state