शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
2
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
3
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
4
लैंगिक अत्याचारातील गुन्हेगारांना पॅरोल मिळणं बंद होणार; पण कैद्यांना मिळणारी पॅरोल आणि फर्लो रजा काय असते?
5
संगीतकार पलाश मुच्छल पुन्हा अडचणीत, सांगलीत ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल
6
तब्बल ३० तासांनंतर पश्चिम बंगालमधील 'त्या' मतदारसंघांचा निकाल समोर आला! ममतादीदींचा बालेकिल्ला उद्ध्वस्त
7
हार्दिक पांड्या-मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? LSGविरूद्धचा सामना न खेळण्याचं खरं कारण आलं समोर
8
पश्चिम बंगालच्या एका मतदारसंघात अद्याप मतमोजणी सुरुच; निकालांचे गॅझेट अद्याप राज्यपालांकडे गेलेच नाहीत...
9
वय ६५ वर्षे तरी जोश भारी! तरुणांना लाजवेल असा वृद्धांचा फिटनेस फंडा; Video तुफान व्हायरल
10
UN Secretary General Election: संयुक्त राष्ट्रात 'स्त्रीशक्ती'चा डंका? चीनच्या एका विधानाने खळबळ!
11
बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे 'चाणक्य' घेणार निर्णय, असामची जबाबदारी नड्डांवर...
12
मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED ची 'लुकआउट' नोटीस 
13
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
14
कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा...
15
नसरापूर हत्याकांड: लैंगिक अत्याचाराच्या आरोपींचा 'पॅरोल' कायमचा बंद होणार; CM फडणवीसांचे कडक निर्देश
16
सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप
17
माळशेज घाटात  भीषण अपघात, एसटी आणि स्कॉर्पियोची समोरासमोर धडक, ४ जणांचा मृत्यू 
18
Latest Marathi News LIVE :राज्यातील २४ अनुदानित आश्रमशाळांची श्रेणीवाढ; मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
19
वादळात पालापाचोळ्यासारखी उडाली पाण्याची टाकी, अधांतरी लटकला काही भाग, सुदैवाने...
20
Gold Silver Price Today: सोन्याच्या किमतीत पुन्हा मोठी घसरण; दर १,४८,००० रुपयांच्या खाली, चांदीही स्वस्त
Daily Top 2Weekly Top 5

बंधार्‍याच्या प्रश्नावर जिल्हाधिकार्‍यांची बैठक

By admin | Updated: May 27, 2014 00:59 IST

जालना : कुंडलिका नदीवर शिरपूर पॅटर्नचे बंधारे बांधण्यासाठी प्रस्ताव मंत्रालयस्तरावर रखडलेला आहे. त्यामुळे बंधारे बांधण्यासाठी मुख्यमंत्री निधीतून मिळालेले ८ कोटी रूपये अखर्चित आहेत

जालना : कुंडलिका नदीवर शिरपूर पॅटर्नचे बंधारे बांधण्यासाठी प्रस्ताव मंत्रालयस्तरावर रखडलेला आहे. त्यामुळे बंधारे बांधण्यासाठी मुख्यमंत्री निधीतून मिळालेले ८ कोटी रूपये अखर्चित आहेत. त्या पार्श्वभूमीवर बंधार्‍यांसदर्भात निर्णय घेण्यासाठी मंगळवारी जिल्हाधिकारी ए.एस. आर. नायक यांच्या अध्यक्षेतेखाली बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीतून बंधार्‍याच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्यावर्षी जालनेकरांनी तीव्र पाणीटंचाईला तोंड दिले. या टंचाईवर मात करण्यासाठी कुंडलिका नदीवर शिरपूर पॅटर्नचे आठ बंधारे बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यापैकी घाणेवाडी जलसंरक्षण मंच तसेच शहरातील उद्योजक, व्यापार्‍यांनी पुढाकार घेऊन रामतीर्थ स्मशानभूमीजवळ बंधारा जालन्यात उभारून तो यशस्वी केला. त्याचप्रमाणे या नदीवर आणखी सात बंधारे बांधण्यात येणार आहे. या बंधार्‍यांसाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गतवर्षी सिद्धीविनायक ट्रस्टच्या माध्यमातून आठ कोटी रूपयांचा उपलब्ध करून दिला. अल्पावधीतच तो निधी जिल्हा प्रशासनाकडे वर्गही करण्यात आला. परंतु या बंधार्‍यांचा प्रस्ताव मंत्रालयस्तरावर रखडला असल्यामुळे निधी मिळूनही बंधार्‍यांची कामे प्रशासकीय मान्यतेअभावी सुरू करता आली नाहीत.मंगळवारी होणार्‍या बैठकीतून जिल्हाधिकारी आपल्या स्तरावर प्रयत्न करावेत अशी अपेक्षा स्वयंसेवी संस्थांकडून व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)