शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

लव्ह स्टोरीचे बिंग फुटण्याची भीती; पोलिस भरती अकॅडमीच्या संचालकांनेच केले विद्यार्थ्याचे अपहरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2025 21:17 IST

केळगाव घाटातील घटना; पोलिसांनी फिल्मी स्टाईल सापळा रचून सर्व आरोपीना रंगेहात पकडले

सिल्लोड: शहरात सुरू असलेल्या एका पोलिस भरती अकॅडमीमध्ये संचालकाने प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याचे अपहरण केल्याची घटना उघडकीस आली आहे. आपल्या लव्हस्टोरीचे बिंग फुटेल म्हणून आरोपीने शनिवारी दुपारी २.३० वाजता केळगाव घाटात विद्यार्थ्याला मारहाण आणि त्याचे अपहरण केले.

अमोल गजानन मख (वय २० वर्षे रा. केळगाव) असे अपहरण झालेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. तर, हिंदवी करीअर अकॅडमीचा संचालक दशरथ विठ्ठल जाधव (रा. सिल्लोड), त्याचा मित्र गणेश कृष्णा जगताप (रा. वडोदचाथा), अकॅडमीत प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी  गणेश सोनूर्सिंग चव्हाण व प्रवीण लालचंद राठोड (दोघे रा. को-हाळा तांडा) अशी आरोपींची नावे आहेत. या सर्व आरोपीना पोलिसांनी अटक करून सिल्लोड न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

अपहरण झालेला अमोल मख सिल्लोड शहरातील हिंदवी करीअर अकॅडमीमध्ये एका वर्षापासून पोलिस भरतीचे प्रशिक्षण घेत होता. तिथे त्याची संचालक दशरथ जाधव यांच्या सोबत मैत्री झाली. जाधव याचे अकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या एका मुलीवर प्रेम होते. जाधवने अमोलला मोहरा करुन दोघांची ओळख करून देण्यास भाग पाडले आणि प्रशिक्षण घेणाऱ्या मुलीसोबत प्रेम प्रकरण सुरू केले.

याबाबत अमोलने संचालकाला खडसावले, त्यावरून दोघांचे एका महिन्यापूर्वी बिनसले. आरोपीने तेव्हाच अमोलला अमोलला अकॅडमीमधून काढून टाकले होते. मात्र, दोघांच्या प्रेम प्रकरणाचे काही व्हाईस रेकॉर्डिंग व पुरावे अमोलकडे होते. त्याने हे पुरावे व्हायरल केले, तर आपले बिंग फुटेल, या भीतीने जाधव यांनी अकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या दोघा मुलांच्या मदतीने अमोलला केळगाव घाटात बोलावून घेतले.

तिथे दबा धरुन बसलेल्या जाधव व त्याच्या एका मित्राने आधी अमोलला लाठ्या काठ्याणी मारहाण केली व प्रेम प्रकरणाचे पुरावे मागितले. त्याने देण्यास नकार दिला असता, त्याला सिल्व्हर रंगाच्या निसान कार (क्रमांक एमएच ४८ ए ९९१८) मध्ये जबरदस्तीने बसवून अपहरण केले. मात्र, कारमध्ये डांबून सिल्लोडकडे नेत असताना अमोलच्या एका ओळखीच्या व्यक्तीने बघितले आणि सिल्लोड ग्रामीण पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र ठाकरे, पोलीस उपनिरीक्षक लहू घोडे आणि इतर कर्मचाऱ्यांनी भराडीजवळ फिल्मी स्टाईल सापळा रचून सर्व आरोपीना रंगेहात पकडले आणि अमोलची सुटका केली.

टॅग्स :sillod-acसिल्लोडCrime Newsगुन्हेगारी