शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हाइट हाऊस गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
3
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
4
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
5
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
6
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
8
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
9
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
10
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
11
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
13
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
14
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
15
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
16
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
17
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
18
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
19
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
20
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

९ दिवसांत धनंजय मुंंडेंना दुसरा धक्का

By admin | Updated: May 8, 2015 00:28 IST

प्रताप नलावडे , बीड भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथराव मुंडे यांच्या निधनानंतर जिल्ह्याचे राजकारण पालकमंत्री पंकजा मुंडे व विरोधी पक्षनेते धनंजय मुंंडे या बहीण- भावाभोवती फिरू लागले आहे

प्रताप नलावडे , बीडभाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथराव मुंडे यांच्या निधनानंतर जिल्ह्याचे राजकारण पालकमंत्री पंकजा मुंडे व विरोधी पक्षनेते धनंजय मुंंडे या बहीण- भावाभोवती फिरू लागले आहे. त्या दोघांत रंगलेल्या वर्चस्वाच्या लढाईत बहीणच भावाला सरस ठरली आहे. वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना संचालकपदाच्या निवडणुकीत ‘व्हाईटवॉश’ दिल्यानंतर अवघ्या नऊ दिवसांत जिल्हा बँकेच्या आखाड्यातही पंकजा यांनी धनंजय मुंडे यांना जोरदार हादरा दिला. सलग दोन विजय नोंदवून त्यांनी स्व. गोपीनाथराव मुंडे यांनी सत्ता गाजवलेले गड अबाधित ठेवण्यात यश मिळवले.विधानसभा निवडणुकीत सहानुभूती व मोदी लाटेवर स्वार होत पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांना आस्मान दाखवत विधानसभेत सलग दुसऱ्यांचा धडक मारली. पंकजा यांना पक्षाने कॅबिनेटमंत्रिपद देऊन सन्मान केला. दुसरीकडे लोकसभा पोटनिवडणुकीत उमेदवार न देणाऱ्या राष्ट्रवादीने पंकजा यांना त्यांच्याच ‘होमपिच’वर शह देण्यासाठी विधानपरिषदेच्या विरोधीपक्षनेतेपदाची माळ धनंजय मुंडे यांच्या गळ्यात टाकली.मुुंडे बहीण- भावाकडे आलेल्या ‘लाल दिव्या’ नंतर त्यांच्यातील राजकीय संघर्ष ठळकपणे दिसून आला. वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदाच्या निवडणुकांत बहीण- भाऊ पुन्हा आमनेसामने उभे ठाकले. वैद्यानाथ कारखाना निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी स्वतंत्र पॅनल उभा करुन पंकजा यांच्यापुढे आव्हान निर्माण केले होते. पंकजा यांनी सर्वच्या सर्व २० जागा खेचून धनंजय यांच्या पॅनलचा धुव्वा उडविला. २८ एप्रिल रोजी कारखान्याचा निकाल जाहीर झाला. ‘वैद्यनाथ’मधील विजयानंतर भाजपाच्या अंगावरील गुलाल पुसलाही नव्हता तोच गुरुवारी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा गुलालात लालेलाल होण्याचा मान भाजपाला मिळाला.या दोन्ही संस्थांमध्ये एकेकाळी स्व. गोपीनाथराव मुंडे यांनी एकहाती सत्ता गाजवली होती. त्यांच्यामागे संस्थेतील भाजपाचे अस्तित्व कायम ठेवण्याची जबाबदारी पंकजा मुंंडे यांच्यावर होती, यात त्या यशस्वी ठरल्या. वैद्यनाथ कारखान्यावर १६ वर्षांपासून भाजपाची हुकूमत होती, त्यामुळे तेथील लढाई पंकजा यांनी आरामात जिंकली. मात्र, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत त्यांना बंधू धनंजय यांच्यासह संपूर्ण राष्ट्रवादीशी सामना करायचा होता. पालकमंत्री पंकजा यांनी गटबाजीचा फायदा घेत राष्ट्रवादीला गारद केले. महायुतीने १६ जागांसह जिल्हा बँकेवर दणदणीत वर्चस्व मिळवले तर राष्ट्रवादीच्या गटाला केवळ तीन जागांवर समाधान मानावे लागले. आ. पंडित यांचे दोन तर माजीमंत्री सोळंके यांचा एक उमेदवार जिल्हा बँकेत निवडून गेला. धनंजय मुंडे यांना मात्र प्रतिनिधीत्वही टिकवता आले नाही.जिल्हा बँक निवडणुकीत राष्ट्रवादी सुरवातीपासूनच निरुत्साही होती. धनंजय यांनी संपूर्ण राजकीय ताकद वैद्यनाथ कारखाना निवडणुकीत पणाला लावली होती.४या निवडणुकीत मुंडे बहीण - भावात आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. कारखाना निवडणुकीच्या प्रचारात डीसीसी बँकेचे मुद्दे गाजले. धनंजय यांनी जिल्हा बँकेतील घोटाळ्यावरुन पंकजा यांच्यावर निशाणा साधला तर पंकजा यांनीही धनंजय यांच्यावर शरसंधान साधण्याची संधी सोडली नाही.जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत स्व. गोपीनाथराव मुंडे यांनीच महायुतीची मोट बांधत ‘होल्ड’ राखला होता. पालकमंत्री पंकजा यांनी देखील महायुती पॅटर्नची परंपरा पुढे नेली.विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आ. अमरसिंह पंडित व माजी मंत्री प्रकाश सोळंके हे तीन नेते वगळता इतरांशी त्यांनी हातमिळवणी केली. राष्ट्रवादीतील गटबाजी तर अधोरेखित झालीच शिवाय धनंजय मुंडे यांच्यासह प्रमुख राजकीय विरोधकांचे त्यांच्याच कंपूमार्फत पानीपत करण्यात पंकजा यांनी यश मिळवले.