शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
5
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
6
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
7
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
8
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
9
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
10
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
11
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
12
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
13
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
14
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
15
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
16
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
17
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
18
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
19
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
20
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

सारोळ्यातील दोन दारुअड्डे उद्ध्वस्त

By admin | Updated: September 4, 2015 00:39 IST

सारोळा : दारूमुळे संसाराची होणारी राखरांगोळी, उद्ध्वस्त होणारी युवा पिढी आणि पोलिसांनी अवैध दारूविक्रेत्यांवर कारवाई करण्याकडे केलेले दुर्लक्ष

सारोळा : दारूमुळे संसाराची होणारी राखरांगोळी, उद्ध्वस्त होणारी युवा पिढी आणि पोलिसांनी अवैध दारूविक्रेत्यांवर कारवाई करण्याकडे केलेले दुर्लक्ष यामुळे संतापलेल्या सारोळा (बु़ता़उस्मानाबाद) येथील रणरागिनींनी गुरूवारी सकाळी रस्त्यावर उतरल्या़ दोन दारूविक्रेत्यांच्या घरातील दारू नष्ट करण्यात आली तर गावच्या शिवारात असलेले दोन दारूचे अड्डे उध्दवस्त करण्यात आले़सारोळा (बु़) गावात काहीजणांनी खुलेआम घरातूनच अवैध दारूविक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे़ तर गावाच्या शिवारात थेट हातभट्टी दारू तयार करण्याचे अड्डे तयार करण्यात आले आहेत़ गावात व गावाच्या शिवारात हातभट्टी दारू मिळत असल्याने गावातील तळीरामांची संख्या वाढली होती़ शिवाय त्यामुळे भांडण-तंटेही वाढले होते़ परिणामी अनेकांचे संसार उध्वस्त झाले असून, युवा पिढीही व्यसनाधीन झाली आहे़ उस्मानाबाद ग्रामीण पोलिसांना वेळोवेळी कारवाईची मागणी केल्यानंतरही केवळ नावालच कारवाई करण्यात येत होती़ त्यानंतर खुलेआम दारूविक्री काही तासातच सुरू होत होती़ सारोळा येथील महिलांनी उपसरपंच कैलास पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुक्ताबाई चिलवंत, मिराबाई नरसुडे, ताई गोरे, लक्ष्मी शिंदे, मई फडके, पद्मबाई कठारे, मंगल रसाळ, संगिता कासार, साखराबाई काकडे, विमल रणदिवे, काशीबाई रणदिवे, नाना साळुंके, दादा सुरवसे, अमोल शिंदे, शैलेश शिंदे, शाम शिंदे, ज्योतीराम रणदिवे, चंद्रकांत मसे, अनंत रसाळ, महेश उकिरडे यांच्यासह शेकडो महिला- नागरिकांनी गुरूवारी सकाळी दारूविक्री करणाऱ्या कविता साळुंके व सविता साळुंके यांच्या राहत्या घरावरच मोर्चा नेला़ कविता साळुंके यांनी घरातील टँकमध्ये ठेवलेली २५ ते ३० लिटर दारू हस्तगत करून ती नष्ट केली़ तर सविता साळुंके यांनी महिला येत असल्याचे समजताच दारू ओतून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला़ त्यानंतर ग्रामस्थांनी गावाच्या परिसरातील पारधी वस्तीवरील दारूअड्ड्याकडे मोर्चा वळविला़ तेथील २५ ते ३० लिटर दारू नष्ट करण्यात आली़ त्यानंतर या महिलांनी गावाच्या शिवारातील नदीच्या आवारात असलेल्या दारू अड्ड्याकडे मोर्चा वळविला़ तेथील राजाभाऊ पवार नामक इसम घटनास्थळावरून पसार झाले़ तेथील साहित्यही महिलांनी जप्त केले़ या कारवाईत महिलांनी एकूण ४०० लीटर दारू नष्ट केली़ संतापलेल्या महिला दारूविक्रेत्यांविरोधात रस्त्यावर उतरल्याची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोनि बाळासाहेब गावडे यांनी पोना सुहास गवळी, गावडे आदींच्या फौजफाट्यासह सारोळा गावाकडे धाव घेतली़ महिलांनी दर्शविलेल्या घटनास्थळांचा पोलिसांनी पंचनामा करून मिळेल ते साहित्य जप्त केले़ तसेच साखराबाई पवार, कविता साळुंके, सविता साळुंके या तिघींना ताब्यात घेतले़ या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हाही नोंदविण्यात आला आहे़ (वार्ताहर)