पाच हजार दिव्यांचा दीपोत्सव

By Admin | Updated: November 14, 2015 00:52 IST2015-11-14T00:01:41+5:302015-11-14T00:52:15+5:30

बनसारोळा : केज तालुक्यातील श्रीक्षेत्र औरंगपुर येथील तुकोबाराय पावनधाम याठिकाणी दिवाळी पाडव्यानिमित्त दीपोत्सवाचे सुंदर आयोजन करण्यात आले.

Deepa Festival for five thousand days | पाच हजार दिव्यांचा दीपोत्सव

पाच हजार दिव्यांचा दीपोत्सव


बनसारोळा : केज तालुक्यातील श्रीक्षेत्र औरंगपुर येथील तुकोबाराय पावनधाम याठिकाणी दिवाळी पाडव्यानिमित्त दीपोत्सवाचे सुंदर आयोजन करण्यात आले. परिसरातील भाविकांनी दीपोत्सवाच्या कार्यक्रमास घरून पणत्या आणून पाच हजार दिव्यांच्या संकल्पित दीपोत्सवाच्या कार्यक्रमास दैदिप्यमान करून टाकले. दीपोत्सवाच्या कार्यक्रमास परिसरातील मुलींनी लक्षवेधक रांगोळ्या काढून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
यावेळी महादेव महाराज बोराडे म्हणाले की, दिव्याप्रमाणे आपणही स्वयंप्रकाशित होऊन इतरांना प्रकाशमान करावे. शेतकऱ्यांनी जीवनाश्यक बाबी शेतातच पिकवून जीवन स्वावलंबी करावे.
गायक प्रा. प्रसाद कुलकर्णी, ओंकार देगलुरकर आणि जनार्धन स्वामी चलवाड यांचा भक्तीरंग हा स्वरमयी अभंगाचा कार्यक्रम संपन्न झाला. दीपोत्सवाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अमोल महाराज, अशोक महाराज, गणेश महाराज भगत आणि भाविकांनी प्रयत्न केले. (वार्ताहर)

Web Title: Deepa Festival for five thousand days