कळमनुरी : तालुक्यातील शिवणी खु. गावाजवळ हिंगोली- नांदेड या मुख्य रस्त्यावर मोटारसायकलच्या धडकेने एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. जवळा बाजार येथील पांडुरंग नाईकनवरे व धारबा नाईकनवरे हे दोघे १५ मे रोजी शिवणी खु. येथे लग्नासाठी आले होते. आॅटोमधून उतरत असताना मोटारसायकल क्र. एमएच ३८- एम २२९८ च्या चालकाने मोटारसायकल भरधाव वेगाने व निष्काळजीपणाने चालवून धारबा तोलबा नाईकनवरे (६२) यांना जोराची धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाले. त्यानंतर जखमीला कळमनुरी येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर नांदेड येथे हलविण्यात आले. नांदेड येथे उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. पांडुरंग धारबा नाईकनवरे यांच्या फिर्यादीवरून मोटारसायकल चालकाविरुद्ध कलम २७९, ३०४ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास व्ही.जी. खंदारे, जगताप हे करीत आहेत. (वार्ताहर)
मोटारसायकलच्या धडकेने एकाचा मृत्यू
By admin | Updated: May 20, 2014 00:05 IST
कळमनुरी : तालुक्यातील शिवणी खु. गावाजवळ हिंगोली- नांदेड या मुख्य रस्त्यावर मोटारसायकलच्या धडकेने एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
मोटारसायकलच्या धडकेने एकाचा मृत्यू
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}