बीड : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा निकाल गुरुवारी जाहीर होणार आहे. या निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष आहे.जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत पाच संचालक यापूर्वीच बिनविरोध निवडून आलेले आहेत. उर्वरित १४ जागांसाठी ३२ उमेदवारांत मंगळवारी झुंज झाली. एकूण ९५ टक्के मतदान झाले आहे. गुरुवारी सकाळी ८ वाजेपासून शहरातील जिल्हा मजूर सहकारी संस्थेच्या कार्यालयात मतमोजणीला प्रारंभ होणार आहे. दुपारी ३ वाजेपर्यंत चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. मतमोजणीदरम्यान मोठा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. तयारी पूर्ण झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी व्ही. एच. जगदाळे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}