दारूसह एका विक्रेत्यास अटक

By Admin | Updated: May 22, 2014 00:34 IST2014-05-22T00:12:32+5:302014-05-22T00:34:09+5:30

हिंगोली : अवैध देशी दारूची विक्री करणार्‍या एकास शहर पोलिसांनी अटक केली आहे. हिंगोली तालुक्यातील आडगाव (मुटकुळे) येथे बुधवारी दुपारी ही कारवाई केली.

Daredevils arrested in a vendor | दारूसह एका विक्रेत्यास अटक

दारूसह एका विक्रेत्यास अटक

हिंगोली : अवैध देशी दारूची विक्री करणार्‍या एकास शहर पोलिसांनी अटक केली आहे. हिंगोली तालुक्यातील आडगाव (मुटकुळे) येथे बुधवारी दुपारी ही कारवाई केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हिंगोली तालुक्यातील आडगाव मुटकुळे येथे एकाकडून देशी दारूची अवैधरित्या विक्री केली जात होती. याबाबतची महिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आडगाव येथे दारूविक्री होणार्‍या ठिकाणी धाड टाकली. त्यात पोलिसांनी ६ हजार रूपये किंमतीच्या १२० देशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. तसेच पोलिसांनी दारू विक्रेता आरोपी प्रकाश अग्रवाल यास अटक केली आहे. पोलिस अधीक्षक सुधीर दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोहेकाँ नानाराव पोले, गंगाधर मस्के, तय्यब अली, कामाजी झळके यांनी ही कारवाई केली.

Web Title: Daredevils arrested in a vendor