शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
3
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
4
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
5
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
6
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
7
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
8
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
9
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
10
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
11
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
12
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
13
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
14
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
15
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
16
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
17
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
18
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
19
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
20
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
Daily Top 2Weekly Top 5

आठ रोमियोंना दामिनी पथकाने दिला हिसका

By admin | Updated: July 29, 2014 01:10 IST

भोकरदन : मुलींची छेडछाड केल्याप्रकरणी महिला पोलिसांच्या दामिनी पथकाने गेल्या दोन दिवसांत भोकरदन शहरात आठ रोडरोमियोंना पकडल्याने खळबळ उडाली आहे.

भोकरदन : मुलींची छेडछाड केल्याप्रकरणी महिला पोलिसांच्या दामिनी पथकाने गेल्या दोन दिवसांत भोकरदन शहरात आठ रोडरोमियोंना पकडल्याने खळबळ उडाली आहे. पोलिस अधीक्षक ज्योतिप्रियासिंह यांनी स्थापन केलेले दामिनी पथक शहरात दाखल झाले आहे. शहरात गेल्या काही दिवसांपासून रोडरोमियोंच्या त्रासाने शाळा-महाविद्यालयात ये-जा करणाऱ्या विद्यार्थिनींना मोठा त्रास होत होता. बसस्थानकामध्येही रोडरोमियोंचा सुळसुळाट सुरू झाला. प्रवेशद्वाराजवळ रिक्षाचालक तसेच काही रोमियो महिला, मुली दिसल्यानंतर टोमणे मारण्याचे काम करत होते. मात्र गेल्या दोन दिवसांपासून शहरात दामिनी पथक दाखल झाल्याने रोडरोमियोंमध्ये खळबळ उडाली आहे. या पथकाने दोन दिवस महाविद्यालय परिसर, बसस्थानक, आदी ठिकाणी साध्या गणवेशात आठ रोडरोमियोंना पकडून कारवाई केली आहे.या पथकाने अटक केलेल्या मध्ये विष्णू तांबडे, अमर चाऊस, राजा चाऊस, राहुल पवार, सुदाम पाटील, परमेश्वर पवार, या रोडरोमियोंना २८ जुलै रोजी पकडून कारवाई केली.तर दोन दिवस अगोदर दोन रोडरोमियोंविरुद्ध कारवाई केली होती. या कारवाईत पोलिस निरीक्षक रामेश्वर रेंगे, दामिनी पथक प्रमुख कमल गिरी, सुरेखा जाधव, मेघा नांगलोद, वंदना म्हस्के, सरोज वाघचौरे, संजीवनी गाढे, सीमा देठे, माधुरी फुके, सुरेश पाटील, महादेव साटोटे, प्रशांत लोखंडे, रामेश्वर सीनकर, संतोष सोनवणे यांच्यासह भोकरदन पोलिस ठाण्यातील कर्मचारी सहभागी झाले होते़ पोलिस निरीक्षक रामेश्वर रेंगे यांनी सांगितले की, शहरातील रोडरोमियोंविरूध्द कोणत्याही क्षणी अचानक येऊन दामिनी पथक कारवाई करणार असल्याचे रेंगे यांनी सागिंतले़ (वार्ताहर)तालुक्यातील मोठ्या गावात शिक्षण घेण्यासाठी परगावी जाणाऱ्या मुलींची छेड काढून त्यांना त्रास देणाऱ्या रोड रोमिओंचा बंदोबस्त करण्यासाठी दामिनी पथक दोन दिवसांपासून मुक्कामी आहे. यात आतापर्यंत १२ रोडरोमिआेंवर कारवाई करण्यात आली. महाविद्यालयांमध्ये जनजागृती करण्यात आली. शिवाय मोबाईल क्रमांक देऊन थेट तक्रार करण्याचा सल्ला दिला.