पत्रा कापून ९० हजारांचा माल लंपास

By Admin | Updated: March 13, 2016 14:42 IST2016-03-13T14:36:44+5:302016-03-13T14:42:58+5:30

नवीन नांदेड : अज्ञात चोरट्यांनी दुकानांवरील पत्रा कापून रोख २२०० रूपये व सूर्य छाप जर्दा, गाय छाप जर्दा आदींसह विविध कंपनीचे सिगारेट असा एकूण ९० हजार रूपयांचा माल लंपास केला.

Cutting the letter cut the goods worth 90 thousand | पत्रा कापून ९० हजारांचा माल लंपास

पत्रा कापून ९० हजारांचा माल लंपास

नवीन नांदेड : अज्ञात चोरट्यांनी दुकानांवरील पत्रा कापून रोख २२०० रूपये व सूर्य छाप जर्दा, गाय छाप जर्दा आदींसह विविध कंपनीचे सिगारेट असा एकूण ९० हजार रूपयांचा माल लंपास केला. ही घटना ११ मार्चच्या रात्री नवीन नांदेड परिसरातील लातूर फाटा येथे घडली.
येथील किराणा दुकानदार सुनील सखाराम शितळे व दत्ता मुदखेडे हे दोन व्यापारी नेहमीप्रमाणे घरी गेले असता चोरट्यांनी ऐवज लंपास केला. याप्रकरणी सुनील सखाराम शितळे (रा.वसरणी नांदेड) यांनी दिलेल्या तक्रारीआधारे नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल केला. पो. नि. गजानन सैदाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक कल्याण बी. नेहरकर व पो. कॉ. चंद्रप्रकाश गायकवाड तपास करीत आहेत. (वार्ताहर)

Web Title: Cutting the letter cut the goods worth 90 thousand