शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेवकांनी केली ‘वाटमारी’

By admin | Updated: July 10, 2014 01:16 IST

औरंगाबाद : महापालिकेत काही नगरसेवकांची दहशत वाढली आहे. त्यांनी लेखा विभागाच्या शिपायाला काल ८ रोजी महसूल उपायुक्तांच्या दालनाबाहेर मारहाण करून ९ कोटी रुपयांचे धनादेश हिसकावून घेतले.

औरंगाबाद : महापालिकेत काही नगरसेवकांची दहशत वाढली आहे. त्यांनी लेखा विभागाच्या शिपायाला काल ८ रोजी महसूल उपायुक्तांच्या दालनाबाहेर मारहाण करून ९ कोटी रुपयांचे धनादेश हिसकावून घेतले. चौर्यकर्म करणाऱ्या त्या नगरसेवकांच्या विरोधात मनपाने पोलिसांत तक्रार दिलेली नाही. शिवाय कोणताही वरिष्ठ अधिकारी या प्रकरणात बोलण्यास तयार नाही. प्रशासन हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करीत असल्याची चर्चा आहे. आज सकाळी आयडीबीआय बँकेला पत्र देऊन सर्व धनादेशांचे पेमेंट थांबविले आहे. मात्र, तोपर्यंत धनादेश हिसकावणाऱ्या नगरसेवकांच्या गुत्तेदारांनी ३ कोटी रुपये बँकेतून काढले होते. हा चोरीचा प्रकार असून प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष आहे. शिपाई, लेखा विभागातील अधिकाऱ्यांपासून सर्व वरिष्ठांनी या प्रकरणी कानाला हात लावल्याने सर्व काही संशयास्पद वाटते आहे.हा सगळा प्रकार लेखा विभागातून धनादेश काढून देण्यासाठी घेतलेल्या सुपारीमुळे घडल्याची चर्चा असून, प्रशासनाच्या मर्जीतील काही (दलाल) नगरसेवकांची काही महिन्यांपासून लेखा विभागात ये-जा वाढली आहे. त्याचा परिणाम म्हणून गेल्या महिन्यात लेखाधिकाऱ्यांची एका नगरसेवकाबरोबर बाचाबाचीही झाली होती. मनपाची विस्कटलेली आर्थिक घडी सध्या कुठेतरी बसत असतानाच मर्जीतील गुत्तेदारांची बिले काढून देण्यासाठी पालिकेत भाईगिरीचे राज्य आलेले दिसते. मे महिन्यानंतर ५ ते ७ कोटींची रक्कम देण्याचा निर्णय मनपाने घेतल्यामुळे पैशांवर सर्वच तुटून पडल्याने हा प्रकार घडला. प्रशासनाचे मत असे...उपायुक्त सुरेश पेडगावकर यांना या प्रकरणी विचारले असता ते म्हणाले की, धनादेशांवर मी स्वाक्षऱ्या केल्या होत्या. धनादेशावर स्वाक्षऱ्या केल्यानंतर पुढे काय झाले हे मला माहिती नाही. धनादेश हिसकावल्याची घटना कुठे घडली याची माहिती शिपायाने दिली असती. मात्र, त्याने माझ्याकडे तशी काही तक्रार केलेली नाही. लेखाधिकारी संजय पवार म्हणाले की, धनादेश संबंधितांच्या नावानेच निघतो. आज सकाळी ‘आयटी डिडक्शन’मुळे बँकेतील पेमेंट थांबविण्यासाठी पत्र दिले होते. ४ वाजेपर्यंत सर्व पेमेंट थांबविण्यात आले होते. धनादेश पळविण्याचा कोणताही प्रकार घडला नसल्याचा दावा त्यांनी केला. का पळविले धनादेश...उपायुक्तांनी स्वाक्षऱ्या केल्यानंतर लेखा विभागात धनादेशाची नोंद एका रजिस्टरमध्ये होते. ती नोंद होण्यापूर्वीच बाहेरच्या बाहेर नगरसेवकांनी धनादेश पुस्तिकेतून फाडून घेतले. हा चोरीचाच प्रकार आहे.अशा पद्धतीमुळे मनपात वेगळ्या प्रकारची दहशत निर्माण होत असल्याचे सूत्रांनी सांगितले. धनादेश देण्यासाठी चिरीमिरीचा प्रकार घडत असावा. त्यामुळे धनादेश काढून देण्यासाठी संबंधितांकडून घेतलेली रक्कम आपल्याच पदरात पडावी. यासाठीच लेखा विभागातील शिपायाला अडवून त्याच्याकडील पुस्तकातून धनादेश फाडून घेत नगरसेवकांनी पोबारा केला. मनपाच्या कामकाजात नगरसेवकांनी हस्तक्षेप करणे हे बेकायदेशीर आहे, असेही सूत्राने सांगितले. पाळत ठेवून केलेला प्रकार1काल ८ रोजी सायंकाळी लेखा विभागातून धनादेश पुस्तिका घेऊन एक शिपाई उपायुक्त सुरेश पेडगावकर यांच्याकडे गेला. पुस्तिकेत सुमारे सात ते आठ धनादेश लिहिलेले होते. उपायुक्त पेडगावकर यांनी अंदाजे ९ कोटी रुपयांच्या धनादेशांवर स्वाक्षऱ्या केल्या. 2शिपाई उपायुक्तांकडून धनादेश पुस्तिका घेऊन लेखा विभागाच्या दिशेने जाताना त्याला तीन नगरसेवकांनी मध्येच अडविले. धनोदश पुस्तिका त्याच्याकडून हिसकावून घेतली. त्यातील आपल्या मर्जीतील गुत्तेदारांचे धनादेश फाडून घेतले. 3शिपायाने विरोध करण्यास सुरुवात करताच त्याला मारहाणही करण्यात आली. धास्तावलेला शिपाई लेखा विभागात परतला. त्याने वरिष्ठांना घडलेला प्रकार सांगितला. लेखा विभागातील वरिष्ठ आणि नगरसेवकांमध्ये फोनवरून बाचाबाची झाली. आज सकाळी प्रशासनाने काल ८ रोजी जारी केलेले धनादेशांचे पेमेंट थांबविण्यासाठी बँकेला पत्र दिले.धनादेश सुरक्षितआयुक्त डॉ.हर्षदीप कांबळे म्हणाले, सर्व धनादेश सुरक्षित आहेत. अनेक धनादेश अदा केले. ते सर्वांना सुरक्षित मिळाले आहेत. एकाचीही तक्रार मनपाकडे आलेली नाही. लेखाधिकारी-१ संजय पवार यांच्याकडे धनादेश देण्याची जबाबदारी आहे. तत्पूर्वी, एन.जी. दुर्राणींकडे ती जबाबदारी होती. मुख्य लेखाधिकारी अशोक थोरात यांचे संचिका तपासणीचे काम आहे. उपायुक्त पेडगावकर यांच्या स्वाक्षरीनंतर धनादेश दिले जातात.