शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
2
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
3
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
4
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
5
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
6
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
7
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
8
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
9
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
10
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
11
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
12
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
13
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
14
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
15
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
16
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
17
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
18
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
19
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
20
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : सुखद ! किराडपुरा येथील कोरोनामुक्त युवकाला रुग्णालयातून सुटी; आतापर्यंत २४ रुग्ण झाले बरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2020 18:35 IST

किराडपूरा येथील पाच रुग्ण आढळून आले होते आतापर्यंत चार रुग्ण कोरोनामुक्त झाले होते.आता शेवटचा रुग्ण सुद्धा करोना मुक्त झाल्याने सध्या तरी किराडपूरा कोरोनामुक्त आहे.

औरंगाबाद : किराडपुरा येथील 22 वर्षीय युवक कोरोनामुक्त झाल्याने त्याला शुक्रवारी दुपारी जिल्हा रुग्णालयातून सुटी देण्यात आली. त्यामुळे कोरोना मुक्त झालेल्यांची संख्या २४ झाली आहे. तर यापूर्वी कोरोनामुक्त झालेला एक वृद्ध पुन्हा कोरोना बाधित झाल्याने जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहे.

किराडपूरा येथील पाच रुग्ण आढळून आले होते आतापर्यंत चार रुग्ण कोरोनामुक्त झाले होते. आता शेवटचा रुग्णसुद्धा कोरोनामुक्त झाल्याने सध्या तरी किराडपूरा कोरोनामुक्त असल्याची परिस्थिती आहे. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सुंदर कुलकर्णी यांनी कोरोनामुक्त झालेल्या रुग्णाला डिस्चार्ज कार्ड दिले. डॉ पद्मा बकाल, डॉ पद्मजा सराफ, डॉ कमलाकर मुदखेडकर आदींची उपस्थिती होती.

दरम्यान, शुक्रवारी दुपारपर्यंत कोरोना संशयित आणि संपर्कातील तब्बल 292 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. मागील काही दिवसात शहरात मोठ्याप्रमाणात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने गुरुवारी रात्रीपर्यंत रुग्णसंख्या 177 वर गेली आहे. यात शुक्रवारी दुपारपर्यंत एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून न आल्याने शहारवासीयांना थोडा दिलासा मिळाला आहे. यात आणखी एक रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतला असल्याने  एक सुखद धक्का शहरवासीयांना बसला आहे.दरम्यान, या रुग्णास १४ दिवस अलगिकरणात राहावे लागणार आहे त्याशिवाय आवश्यक सल्ला डॉ पद्मजा सराफ यांनी युवकाला दिला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद