शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
2
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
3
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
4
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
5
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
6
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
7
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
8
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
9
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
10
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
11
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
12
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
13
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
14
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
15
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
16
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
17
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
18
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
19
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
20
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : कोरोना पॉझिटिव्ह जवान हिरापूर येथे होता मुक्कामी; प्रशासनाकडून गाव सील, ६ क्वारंटाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2020 18:22 IST

मालेगाव नाशिक येथून बंदोबस्तातुन परतलेला जवान हिरापुर ता.औरंगाबाद येथे सहा दिवस वास्तव्यास होता.

करमाड : एसआरपीएफचा कोरोना पॉझिटिव्ह जवान हिरापूर (ता.औरंगाबाद) येथे ६ दिवस राहील्याचे समजताच वरूडकाजी पंचक्रोशीत एकच खळबळ उडाली. यानंतर हिरापूर गाव प्रशासनाने सील केले असून जवानाच्या कुटुंबातील सहा जण क्वारंटाईन करण्यात आले आहेत.

मालेगाव नाशिक येथून बंदोबस्तातुन परतलेला जवान हिरापुर ता.औरंगाबाद येथे सहा दिवस वास्तव्यास होता. याची माहिती मिळताच चिकलठाणा पोलिसांच्या वतीने तात्काळ गावात संचार बंदी लागू करण्यात आली व कुटुंबातील सदस्यांना तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.

वरुडकाजी जवळील हिरापूर  ता.औरंगाबाद येथील एक SRPF चा जवान जालना येथे कार्यरत असून तो नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे बंदोबस्त कामी गेलेला होता. कर्तव्यावरून सुट्टी घेऊन तो २०  एप्रिल रोजी आपल्या पत्नी व २ मुलांसह दुचाकीवर हिरापूर येथे आई वडिलांना भेटण्यासाठी आला होता. सहा दिवस हिरापूर येथे राहिल्यानंतर २६ तारखेला तो जवान पत्नी व मुलांना घेऊन जालना येथे कर्तव्यावर हजर होण्यासाठी गेला. ३० तारखेला या जवानाचा कोरोना चाचणी घेण्यात आली व २ मे रोजी त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. या घटनेची माहिती मिळताच चिकलठाणा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पो.नी. महेश आंधळे हे आपल्या सहकाऱ्यांसोबत हिरापूर येथे दाखल झाले  व तात्काळ गाव सील करण्यात आले. 

या जवानाच्या परिवारातील आई वडील, भाऊ, भाऊजाई, भावाची २ मुले यांना चिकलठाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात तपासणी साठी पाठवण्यात आले असून. जवानांच्या संपर्कात अलेल्या इतरांचा शोध घेणे सुरू आहे. या घटनेमुळे वरुड काजी, शेंद्रा गाव व एमआयडीसी, कुंभफळ, गंगापूर - जहागीर, महालपिंप्री, कच्छीघाटी, वडखा, वरझडी , गोपाळपूर अशा 10 ते 12  गावात प्रचंड दहशत पसरली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद