महाराष्ट्रात धर्मांतर, लव्ह जिहाद अन् ड्रग्जचे 'थ्री-स्टेज' रॅकेट; शिरसाटांचा खळबळजनक आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2026 16:22 IST2026-05-09T16:21:24+5:302026-05-09T16:22:18+5:30

"महाराष्ट्रात 'काश्मीर फाईल्स'सारखे षडयंत्र!" निदा खान प्रकरणी संजय शिरसाटांची 'एसआयटी' चौकशीची मागणी.

Conversion, Love Jihad, and Drugs: Sanjay Shirsat Claims 'Three-Stage' Conspiracy Behind TCS Case; Demands SIT Probe. | महाराष्ट्रात धर्मांतर, लव्ह जिहाद अन् ड्रग्जचे 'थ्री-स्टेज' रॅकेट; शिरसाटांचा खळबळजनक आरोप

महाराष्ट्रात धर्मांतर, लव्ह जिहाद अन् ड्रग्जचे 'थ्री-स्टेज' रॅकेट; शिरसाटांचा खळबळजनक आरोप

छत्रपती संभाजीनगर: नाशिकमधील टीसीएस कंपनीतील कथित धर्मांतर प्रकरणाने आता उग्र राजकीय वळण घेतले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खान हिला छत्रपती संभाजीनगरमधून अटक झाल्यानंतर, मंत्री संजय शिरसाट यांनी एमआयएम नेत्यांवर थेट हल्ला चढवला आहे. "हे प्रकरण केवळ निदा खानपुरते मर्यादित नसून, यात धर्मांतर, लव्ह जिहाद आणि ड्रग्ज तस्करीचे मोठे रॅकेट सक्रिय आहे," असा दावा शिरसाट यांनी पत्रकार परिषदेत केला.

इम्तियाज जलील आणि ओवेसींवर निशाणा
संजय शिरसाट यांनी आरोप केला की, निदा खानचा छत्रपती संभाजीनगरशी कोणताही संबंध नसताना तिला इथे आश्रय दिला गेला. "एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनीच आपल्या नगरसेवकाला (मतीन पटेल) निदा खानला घर देण्यासाठी मजबूर केले. आता मतीन पटेलला वाचवण्यासाठी असदुद्दीन ओवेसी स्वतः छत्रपती संभाजीनगरमध्ये आले आहेत," असे शिरसाट म्हणाले. आरोपीला फरार करणे आणि नंतर छातीठोकपणे समर्थन करणे हे जाणूनबुजून केले जात असल्याचेही त्यांनी नमूद केले.

'थ्री-स्टेज' रॅकेटचा दावा
शिरसाट पुढे म्हणाले की, "पहिले धर्मांतर करणे, दुसरे लव्ह जिहाद आणि तिसरे म्हणजे ड्रग्जचा व्यापार करून तरुण पिढीला नशेखोर करणे, अशा तीन टप्प्यांत हे काम सुरू आहे. हे सर्व प्रकार महाराष्ट्रात 'काश्मीर फाईल्स'प्रमाणे घडत असून, याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे."

एसआयटी चौकशीची मागणी
या प्रकरणाची पाळेमुळे खोदून काढण्यासाठी शिरसाट आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देऊन 'एसआयटी' चौकशीची मागणी करणार आहेत. "पोलिसांनी कोणाच्याही दबावाखाली येऊ नये, सरकार तुमच्या पाठीशी खंबीर आहे," असा विश्वासही त्यांनी नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर पोलिसांना दिला.

Web Title : महाराष्ट्र: धर्मांतरण, लव जिहाद, ड्रग्स का 'थ्री-स्टेज' रैकेट, शिरसाट का आरोप

Web Summary : मंत्री शिरसाट ने महाराष्ट्र में धर्मांतरण, लव जिहाद और ड्रग्स के 'थ्री-स्टेज' रैकेट का आरोप लगाया है। निदा खान की गिरफ्तारी के बाद, उन्होंने एमआईएम नेताओं पर उसे शरण देने का आरोप लगाया और नेटवर्क की जड़ों को उजागर करने के लिए एसआईटी जांच की मांग की, जिसकी तुलना 'कश्मीर फाइल्स' से की गई है।

Web Title : Maharashtra: Conversion, Love Jihad, Drugs a 'Three-Stage' Racket, Alleges Shirsat

Web Summary : Minister Shirsat alleges a 'three-stage' racket of conversion, love jihad, and drugs in Maharashtra, following the arrest of Nida Khan. He accuses MIM leaders of harboring her and demands an SIT investigation to uncover the roots of the network, comparing it to 'Kashmir Files'.