शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

‘गोंधळ मांडिला, आई गोंधळाला यावं’

By admin | Updated: September 29, 2014 00:41 IST

औरंगाबाद : स्थळ- सिडको एन-९ परिसरातील प्रती माहूर म्हणून ओळखले जाणारे रेणुकामाता मंदिर. वेळ- सायंकाळी ७.३० वाजेची. आरतीसाठी शेकडो भाविक शिस्तीने येथे बसले होते.

औरंगाबाद : स्थळ- सिडको एन-९ परिसरातील प्रती माहूर म्हणून ओळखले जाणारे रेणुकामाता मंदिर. वेळ- सायंकाळी ७.३० वाजेची. आरतीसाठी शेकडो भाविक शिस्तीने येथे बसले होते. आरती झाली आणि नागरिकांमधून तुणतुणे, संबळ वाजवत चार जण समोर आले.‘तुळजापूरची भवानी आई, गोंधळाला यावं, कोल्हापूरची अंबाबार्ई, गोंधळाला यावं, गोंधळ मांडिला, आई गोंधळाला यावं...’असे गात कुलस्वामिनी, ग्रामदेवी, आराध्यदैवत, अशा सर्व दैवतांना गोंधळाला येण्याचे आवाहन केले जाऊ लागले.... आणि हे पाहण्यासाठी भाविकांची गर्दी उसळली.गोंधळाचा कार्यक्रम रंगत होता, तसतसा भाविकांचा उत्साह वाढत होता... असे दृश्य सध्या नवरात्रोत्सवात पाहावयास मिळत आहे. रेणुकामाता मंदिरात नवरात्रोत्सवात सायंकाळी देवीची आरती व त्यानंतर धार्मिक कार्यक्रम पाहणे म्हणजे एक सुवर्णयोगच होय. डोळ्याचे पारणे फेडणारा हा धार्मिक सोहळा पाहण्यासाठी आता सिडको- हडकोच नव्हे तर जुन्या शहरातून तसेच आसपासच्या पंचक्रोशीतूनही भाविक मोठ्या संख्येने येत असतात. मागील २७ वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे. सायंकाळी शहरातील मान्यवरांच्या हस्ते देवीची आरती केली जाते. ही आरती रेणुकामाता भजनी मंडळ तालासुरात सादर करते. सामूहिकरीत्या आरती गाताना भाविकही हरखून जातात. सुमारे एक ते सव्वातास विविध आरत्या गाण्यात येतात. यानंतर देवीची पदे गायली जातात व गोंधळ सादर करण्यासाठी दिलीप पाटील व दादा राजहंस सज्ज होतात. अंगात झबला, कपाळावर कुंकू, गळ्यात कवड्यांची माळ, अशा वेशभूषेतील हे गोंधळी सर्वप्रथम विविध देवी-देवतांना आमंत्रण देतात. त्यानंतर देवीचा जोगवा मागितला जातो. ‘अनादी निर्गुण प्रगटली भवानी... आईचा जोगवा जोगवा मागीन...’ आदी गोंधळ गायला जातो. हा धार्मिक कार्यक्रम पाहण्यासाठी शेकडो भाविक मंदिर परिसरात तासन्तास उभे असतात.