शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणच्या बैठकीत तक्रारींचा पाऊस

By admin | Updated: July 8, 2017 00:06 IST

सेलू : ग्रामीण भागातील बिकट बनत चाललेल्या वीजप्रश्नांवर आ. विजय भांबळे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली.

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू : ग्रामीण भागातील बिकट बनत चाललेल्या वीजप्रश्नांवर आ. विजय भांबळे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांची साई नाट्य मंदिरात ७ जुलै रोजी बैठक घेतली. त्यात अनेक गावच्या शेतकऱ्यांनी विजेच्या संदर्भातील अनेक तक्रारी करीत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. शहरातील नगरपालिकेच्या श्री साईनाट्य गृहात ग्रामीण भागासह शहरी भागातील वीज प्रश्नावर आ. विजय भांबळे यांनी महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची संयुक्त बैठक आयोजित केली होती. या बैठकीला ग्रामीण भागातील शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते. लघुदाब वाहिनी जागोजागी जीर्ण झाली आहे. ही वाहिनी चाळीस वर्षांपूर्वीची असल्यामुळे ग्रामीण भागात वीज पुरवठा सुरळीत होत नाही. तसेच एलटी लाईन किरकोळ तांत्रिक कारणामुळे बंद पडत आहे. त्यामुळे कृषीपंंपांना वीज मिळत नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली. कीटकॅट, केबल, बॉक्स इ. साहित्य जळण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. ११ के.व्ही. वाहिन्यांची दुरुस्ती करणे आवश्यक झाले आहे. परंतु, साहित्य उपलब्ध होत नसल्यामुळे दुरुस्तीचे काम रखडले आहे. परिणामी पाणी असूनही शेतकऱ्यांना विजेअभावी पिकांना पाणी देणे अवघड झाले आहे. तसेच भारनियमनाव्यतीरिक्त गावांचाही वीज पुरवठा तासन्तास खंडित होत आहे. नवीन डीपी, लोंबकळलेल्या तारा, नवीन वीजजोडणी, डीपी दुरुस्ती इ. प्रश्न या बैठकीत शेतकऱ्यांनी उपस्थित केले. तांत्रिक कारणामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार ग्रामीण भागात वाढले आहेत, अशा वेळी संबंधित कर्मचारी दुरुस्तीचे काम करण्यास विलंब करीत असल्याची कैफियत शेतकऱ्यांनी मांडली. दरम्यान, ग्रामीण भागातील विजेचे प्रश्न एका महिन्यात निकाली काढा अन्यथा संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा आ. भांबळे यांनी दिला. यावेळी जि. प. सभापती अशोक काकडे, जि. प. सदस्य राजेंद्र लहाने, उपविभागीय अभियंता राजेश मेश्राम, राकॉँचे जिल्हा उपाध्यक्ष विनायक पावडे, अ‍ॅड. बाळासाहेब रोडगे, माऊली ताठे, सुधाकर रोकडे, अज्जू कादरी यांच्यासह महावितरणचे शाखा अभियंता व कर्मचारी उपस्थित होते.