पाण्यासाठी नागरिकांच्या प्रतिक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:29 IST2020-12-17T04:29:03+5:302020-12-17T04:29:03+5:30
कित्येक दिवसांचा रेंगाळलेला प्रश्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाणीपुरवठ्याच्या योजनेचे उद्घाटन करून मार्गी लावला; परंतु प्रत्यक्षात हे पाणी जनतेच्या ...

पाण्यासाठी नागरिकांच्या प्रतिक्रिया
कित्येक दिवसांचा रेंगाळलेला प्रश्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाणीपुरवठ्याच्या योजनेचे उद्घाटन करून मार्गी लावला; परंतु प्रत्यक्षात हे पाणी जनतेच्या हंड्यापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारीही तेवढीच महत्त्वाची आहे.
- अभिजित म्हस्के (बायपास परिसर)
पाण्यावरच नागरिकांचा खर्च
पाणी समस्या सतत भेडसावत असून, दर महिन्याला पाण्यावर अधिक खर्च केला जातो. पिण्यासाठी वेगळे, तसेच वापरासाठी वेगळ्या पाण्याच्या टँकरसाठी पैसे मोजावे लागतात. घरी आलेल्या पाहुण्यांसमोर पाण्यासाठी निघणारे वाभाडे सातारा-देवळाईसाठी लाजिरवाणे ठरले आहे.
- एस.एस. बोडखे (छत्रपतीनगर)
पाण्यासाठीच विकास रखडला
स्मार्ट सिटी शहराला उन्हाळ्यात फक्त पाणी समस्येने आर्थिक विवंचनेत टाकले आहे. सातत्याने दर उन्हाळ्यात टँकरच्या पाण्यावर तहान भागविली जात होती. नवीन होणाऱ्या पाणीपुरवठा योजनेमुळे मुबलक पाणी मिळेल व रखडलेला विकास गतिमान होईल.
- जमील पटेल (सातारा)