शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

जायकवाडीचे पाणी छ. संभाजीनगरच्या उंबरठ्यावर, पण 'तीन दिवसाआड' पाणी मिळणार कधी?

By मुजीब देवणीकर | Updated: April 17, 2026 20:04 IST

तहानलेल्या शहरवासियांसाठी आनंदाची बातमी, पण प्रतीक्षा कायम! जूनपासून शहराचा पाणीपुरवठा सुधारण्याची दाट शक्यता.

छत्रपती संभाजीनगर : गतवर्षी ९०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीमुळे शहराला वाढीव ७५ एमएलडी पाणी मिळेल. नागरिकांना दोन ते तीन दिवसाआड पाणी येणारच असे दिवास्वप्न दाखविण्यात आले. प्रत्यक्षात या जलवाहिनीतून १८ ते २० एमएलडी पाणी येत आहे. आता यंदाच्या उन्हाळ्यात २५०० मि.मी. व्यासाच्या नवीन जलवाहिनीद्वारे वाढीव २०० एमएलडी पाण्याचे स्वप्न दाखविले. १४ एप्रिलला जायकवाडीचे पाणी नक्षत्रवाडीपर्यंत आणले. जलशुद्धिकरण केंद्राची परीक्षा अजून बाकी आहे. या सर्व प्रक्रियेला किमान एक महिना तरी लागणार आहे. नागरिकांना जून महिन्यात वाढीव ५० एमएलडी पाणी नागरिकांना मिळण्याची दाट शक्यता आहे. तेव्हा शहराला तीन दिवसाआड पाणी मिळू शकते.

२७४० कोटी रुपये खर्च करून नवीन पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा सर्वांत मोठा टप्पा १४ एप्रिलला झाला. जायकवाडीहून नक्षत्रवाडी जलशुद्धिकरण केंद्रापर्यंत एका पंपद्वारे पाणी आणण्यात आले. आता जलशुद्धिकरण केंद्राची टेस्ट बाकी आहे. या टेस्टला किमान १ महिना लागू शकतो. जायकवाडीहून येणारे पाणी येथे शुद्ध होऊ लागल्यास ते पाणी जुन्या पाणीपुरवठा योजनेच्या एमबीआरमध्ये ५० एमएलडीपर्यंत घेता येऊ शकते. या वाढीव पाण्यामुळे नागरिकांना तीन दिवसाआड पाणी मिळू शकते.

नवीन योजनेची कामे अर्धवटनवीन पाणीपुरवठा योजनेची कामे अर्धवट आहेत. शहरात तीन जलवाहिन्यांद्वारे पाणी आणले जाईल. त्यातील हर्सूल येथे जाणारी जलवाहिनी पूर्ण आहे. या जलवाहिनीला विविध जलकुंभापर्यंत कनेक्शन देण्यात आलेले नाहीत. जलकुंभातून नागरिकांना पाणी देण्यासाठीही कनेक्शन दिलेले नाही. या सर्व प्रक्रियेला बराच कालावधी लागू शकतो. केटली गार्डन, पहाडसिंगपुऱ्याकडे जाणाऱ्या जलवाहिनीचे काम अपूर्ण आहे.

१४० एमएलडी पाण्याची आवकशहरात सध्या ७००, ९००, १२०० मिमी व्यासाच्या तीन जलवाहिन्यांमधून १४० एमएलडीपर्यंत पाणी येत आहे. येणाऱ्या पाण्याचे योग्य वितरण होत नाही. त्यामुळे नागरिकांना आठ ते दहा दिवसांनंतर पाणी मिळत आहे. नवीन योजनेतून आणखी ५० एमएलडी वाढीव पाणी सिडको-हडको, जुन्या शहराला मिळाल्यास नागरिकांना तीन दिवसाआड पाणी मिळू शकते.

पाणी देण्याचे नियोजन केलेनवीन योजनेतील कामे पूर्ण होण्यास विलंब होत असल्याने अगोदरच नक्षत्रवाडी येथील जुन्या एमबीआरला काही प्रमाणात पाणी देण्याची तरतूद महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने (मजीप्रा) केली आहे. जलशुद्धिकरण केंद्राची टेस्ट, क्लोरिन मिक्सिंग लायसन्स मिळताच वाढीव ५० एमएलडी पाणी मनपाच्या जुन्या योजनेला देण्यात येईल.- मनीषा पलांडे, मुख्य अभियंता, मजीप्रा

English
हिंदी सारांश
Web Title : Jaikwadi Water Reaches Chhatrapati Sambhajinagar, But When Will Three-Day Supply Start?

Web Summary : Chhatrapati Sambhajinagar awaits increased water supply from Jaikwadi, but delays persist. New pipeline tests continue; increased water flow expected in June, potentially enabling water every three days. Project faces setbacks, impacting connections and distribution, despite existing 140 MLD supply.
टॅग्स :Municipal Corporationनगर पालिकाWaterपाणीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरJayakwadi Damजायकवाडी धरण